World Boxing Cup Finals : निखत झरीन इज बॅक! वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये भारताचा डंका; ९ सुवर्णपदकांसह रचला इतिहास

World Boxing Cup Finals 2025 : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स २०२५ मध्ये भारतीय बॉक्सर्सनी जबरदस्त कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला आहे. भारताची स्टार खेळाडू निकहत झरीनने ५१ किलोग्रॅम महिला गटात सुवर्णपदक* जिंकले. अंतिम सामन्यात निखतने चीनी तैपेईच्या झुआन यी गुओचा ५-० अशा एकतर्फी निर्णयाने पराभव केला.
या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या २० झाली आहे, ज्यात ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय महिला आणि पुरुषांनी स्पर्धेतील सर्व वजन गटांमध्ये २० पदक* जिंकण्यात यश मिळवले आहे.
महिलांची चमकदार कामगिरी –
Congratulations to all the champions who turned the boxing ring into glory 🏅⭐️#WorldBoxing #WorldBoxingCupFinals2025 #Boxing pic.twitter.com/FWrLENbLaY
— Boxing Federation (@BFI_official) November 21, 2025
महिला गटात भारताला एकूण ७ सुवर्णपदके मिळाली आहेत. निखत झरीन व्यतिरिक्त मीनाक्षी हुड्डा, प्रीती पवार, जैस्मिन लंबोरिया, परवीन हुड्डा, अरुंधती आणि नूपुर श्योराण यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.
जैस्मिन लंबोरिया (विद्यमान विश्वविजेती) हिने या स्पर्धेत एक मोठी आणि अविस्मरणीय लढत जिंकली. तिने पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या वू शिह यीचा ४-१ ने पराभव केला. निखत झरीनसाठी हे पदक २०२३ च्या विश्व चॅम्पियनशिप नंतरचे पहिले सुवर्ण ठरले आहे.
पुरुषांनी जिंकली दोन सुवर्णपदकं –
Fought with heart, finished with honor 🥈
Our silver medallists of World Boxing Cup Finals 2025 🥊⭐️#WorldBoxing #WorldBoxingCupFinals2025 #Boxing pic.twitter.com/F3nYkCggsk— Boxing Federation (@BFI_official) November 21, 2025
भारतीय पुरुषांनीही २ सुवर्णपदके जिंकली. ज्यामध्ये सचिन सिवाच (६० किलोग्रॅम) याने किर्गिस्तानच्या मुनारबेक उलु सेइतबेकला ५-० ने हरवून सुवर्णपदक मिळवले. दुसरे सुवर्णपदक हितेश गूलियाने (७० किलोग्रॅम) कझाकस्तानच्या नुर्बेक मुरसालचा ३-२ ने पराभव करून आपल्या नावावर केले. याव्यतिरिक्त, जदुमणी सिंह, पवन बर्तवाल, अविनाश जामवाल आणि अंकुश फंगल यांनी रौप्यपदक जिंकले.





