Elorda Cup 2024 : एलोर्डा कपमध्ये भारतीय महिला बॉक्सरचं वर्चस्व, निखत झरिनसह 4 बॉक्सर्स फायनलमध्ये…

Elorda Cup 2024 (Boxing) : वर्ल्ड चॅम्पियन निखत झरिनने एलोर्डा कप बॉक्सिंगच्या 52 वजनी गटात कझाकिस्तानच्या टोमिरिस मिर्झाकुलचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिच्याशिवाय मीनाक्षी (48), अनामिका (50), मनीषा (60) यांनीही उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. एलोर्डा कप बॉक्सिंगचे अंतिम सामने हे शनिवारी (18 मे) होणार आहेत.
मीनाक्षीने कझाकिस्तानच्या गुलनाज बुरिबायेवाचा तर मनीषाने त्याच देशाच्या टांगातार आसेमचा 5-0 असा पराभव केला. तर अनामिकाने कझाकिस्तानच्या गुलनारचा पराभव केला. गुलनार हिला तीन इशाऱ्यांनंतर अपात्र ठरवण्यात आले. तर सोनू (63) आणि मंजू बांबोरिया (66) यांना उपांत्य फेरीत पराभूत होऊन कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सोनूला उज्बेकिस्तानच्या जीदा याराशेवाविरुद्ध 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला, तर मंजूला चीनच्या लियू यांग विरुद्ध 0-5 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.





