‘हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना सर्व माहिती होती’ ; कॅनडाच्या माजी पोलिस अधिकाऱ्याचा मोठा दावा

India Canada Conflict । टोरंटोच्या एका माजी पोलीस सार्जंटने ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरावर खलिस्तानी कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला आहे. माजी सार्जंट (डिटेक्टीव्ह) डोनाल्ड बेस्ट, जे आता एक शोध पत्रकार आहेत त्यांनी, कॅनेडियन पोलिसांना माहिती होती की त्यांचा एक अधिकारी हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसक निषेधात सामील होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सार्जंटला निलंबित करण्यात आले होते.
डोनाल्ड बेस्टने दावा केला की,”या सार्जंटने ऑक्टोबरमध्ये खलिस्तानी कट्टरपंथीयांनी आयोजित केलेल्या निषेधांमध्ये याआधीच भाग घेतला होता”. ते पुढे म्हणाले, “हिंदू सभा मंदिरात जे घडले ते कॅनडात गुन्हा आहे, तुम्हाला धार्मिक सभेत व्यत्यय आणण्याची परवानगी नाही. पहिला दगड कोणी फेकला, कोणी कोणाला मारले हे मला माहीत नाही, पण मला माहीत आहे की अनेक खलिस्तानी फुटीरतावादी आंदोलकांनी तेथील काही हिंदूंवर शारीरिक हल्ले केले. मारामारीचे व्हिडिओही आम्ही पाहिले आहेत. हल्लेखोरांमध्ये एक पील पोलिस अधिकारीही दिसत होता. ऑक्टोबरमध्ये खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या निदर्शनांदरम्यान हाच अधिकारी दिसला होता.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘खलिस्तानी कनेक्शनची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती होती’ India Canada Conflict ।
बेस्टने पुढे बोलताना,”ऑक्टोबरच्या मध्यात टोरंटोच्या डाउनटाउनमध्ये निषेध करण्यात आला. मी तोच पोलीस अधिकारी त्या आंदोलनात पाहिला. त्यांच्या हातात फलक आणि झेंडा होता आणि कॅनडात भारतीय वाणिज्य दूतावासावर बंदी घालण्यात यावी”, असे या फलकावर लिहिले होते. या अधिकाऱ्याने खलिस्तानी फुटीरतावादी आंदोलनात भाग घेतला हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नसावे, तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यात मला शंका नाही.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्हिडिओमध्ये दिसताच त्याला निलंबित करण्यात आले India Canada Conflict ।
रविवारी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात झालेल्या निषेधाच्या व्हिडिओमध्ये एका पील प्रादेशिक पोलिस अधिकाऱ्याची ओळख पटल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. सार्जंट हरिंदर सोही असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. पील पोलिसांचे प्रवक्ते रिचर्ड चिन म्हणाले की, त्यांना सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओबद्दल माहिती आहे ज्यामध्ये त्यांचा एक ऑफ-ड्युटी अधिकारी आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. तेव्हापासून त्याला निलंबित करण्यात आले आहे.





