India-Bangladesh Border : भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार; घुसखोरी करणारा बांगलादेशी तरुण ठार
त्रिपुरातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात (India-Bangladesh Border) एक बांगलादेशी तरुण ठार झाला.

India-Bangladesh Border : त्रिपुरातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात (India-Bangladesh Border) एक बांगलादेशी तरुण ठार झाला. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, मुजीबुर रहमान मुजीब (२६) हा बांगलादेशी तरुण बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
जेव्हा भारतीय जवानांनी तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुजीब आणि त्याच्या मित्रांनी सुरक्षा दलांवर गोळीबार (India-Bangladesh Border) केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत मुजीबुर रहमान जागीच ठार झाला, तर त्याचे अनेक साथीदार बांगलादेशच्या दिशेने पळून गेले. या घटनेत आणखी किमान तीन जण जखमी झाले आहेत, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या घटनेनंतर, सुरक्षा दलांनी सीमावर्ती भागात तस्करीसाठी साठवलेल्या मोठ्या प्रमाणात बिड्या जप्त केल्या. रात्री मृतदेह ताब्यात घेऊन कैलाशहरच्या भगवाननगर येथील उनाकोटी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उनाकोटीच्या डाॅक्टरांनी सांगितले की, बीएसएफ जवान आणि इराणी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संयुक्तपणे मृतदेह रुग्णालयात पोहोचवला.
ही घटना दुपारी घडली असली तरी, आवश्यक कायदेशीर सोपस्कार रात्रभरात पूर्ण होऊ शकले नाहीत. सदर घुसखोराचा मृतदेह बांगलादेश (India-Bangladesh Border) लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, बांग्लादेशी समकक्षांसोबत ध्वज बैठक झाल्यानंतर, बीएसएफ अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कैलाशहर येथील मनु लँड कस्टम्स कॉम्प्लेक्समध्ये मृताचा मृतदेह बांग्लादेशी सीमा रक्षकांच्या ताब्यात दिला.





