Tripura Border : सीमा सुरक्षा दलाची मोठी कारवाई ! त्रिपुरा सीमेवर 2 संशयित बांगलादेशी तस्कर ठार

आगरताळा : दक्षिण त्रिपुरातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाने दोन संशयित बांगलादेशी तस्करांना ठार मारले. अमजदानगर भागात ही घटना घडली. बीएसएफच्या अधिका-यांनी सांगितले की, जेव्हा तस्करी थांबविण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तस्कर आक्रमक झाले, त्यानंतर स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात गोळी उडाली.
या गोळीबारात तीन तस्कर जखमी झाले. त्यातील एकाचा घटनास्थळाचा मृत्यू झाला. उरलेल्या जखमी तस्करांना हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले. तिथे आणखी एक तस्कर मरण पावला. तिस-या तस्करावर उपचार अजूनही चालू आहे.
या घटनेदरम्यान, घटनास्थळावरून 15 लाख रुपयांच्या बेकायदेशीर औषधांचा माल ताब्यात घेण्यात आला. ही औषधे तस्करीच्या माध्यमातून बांगलादेशातून आणली जात आहेत. तस्करांकडून कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. या प्रकरणात दोन भारतीय तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. तस्करी नेटवर्कची माहिती त्यांच्याकडे प्रश्न विचारून गोळा केली जात आहे.





