भारताचा बांगलादेशला टोला ; म्हटले,”आधी स्वतःच्या घरात बघा”

India-Bangladesh । पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून झालेल्या हिंसाचारावर बांगलादेशच्या टिप्पण्याला भारताने जोरदारपणे प्रत्युत्तर दिले आहे. भारताने याविषयी बोलताना, “ही टिप्पणी चुकीची आहे आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांवरून लक्ष विचलित करणे हा त्याचा उद्देश असल्याचा आरोप केला आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव यांनी बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात अलिकडच्या हिंसाचारात भारताला मुस्लिम अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. या हिंसाचारात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो लोक जखमी झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले निवेदन India-Bangladesh ।
बांगलादेशच्या टीकेला नकार देताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल , बांगलादेशने भारतावर “खोट्या आणि निराधार” टिप्पण्या करण्याऐवजी आपल्या देशात राहणाऱ्या अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. असे म्हणत त्यांना सडेतोड उत्तर दिले.
आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करावं India-Bangladesh ।
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी, “पश्चिम बंगालमधील घटनांबद्दल बांगलादेशने केलेले विधान आम्ही स्वीकारण्यास नकार देतो. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल भारताच्या चिंतेवरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे. असे गुन्हे करणारे लोक तिथे मुक्तपणे फिरत आहेत.”असे म्हटले. पुढे बोलताना म्हणाले, “अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी आणि चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, बांगलादेशने आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
हेही वाचा
मोठा झटका ! ट्रम्प यांच्या नागरिकत्व निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा ‘ब्रेक’ : स्थगितीमुळे भविष्यात काय होणार?
दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट ; वक्फ कायदा केल्याबद्दल मानले आभार





