IND vs AUS ECTA | भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार यशस्वी – केंद्रीय उद्योग मंत्री गोयल

India-Australia Economic Cooperation and Trade Agreement :- भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल 2022 रोजी मुक्त व्यापार करारावर सही केली. या कराराची अंमलबजावणी 29 डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाली. या करारामुळे सरलेल्या वर्षात भारताची ऑस्ट्रेलियाला झालेले निर्यात 14 टक्क्याने वाढण्यास मदत झाली आहे, असे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
या करारामुळे भारतातील छोट्या उद्योगांना आणि शेतकर्यांना ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्याची संधी मिळाली. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळाली असल्याचा दावा गोयल यांनी केला. या करारामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचार्यांना ऑस्ट्रेलियामध्ये जाता येत आहे. या क्षेत्राची ऑस्ट्रेलियाला निर्यात वाढत आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही देशा दरम्यानचा पर्यटन व्यवसाय यामुळे वाढत आहे.
साल 2020-21 मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा व्यापार केवळ 12.2 अब्ज डॉलरचा होता. तो आता 26 अब्ज डॉलर पर्यंत गेला आहे. अशा प्रकारचे व्यापार करार युरोपातील अनेक देशाबरोबर करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. मध्यपूर्वेतील अनेक देशाबरोबरही अशा प्रकारचा व्यापार करार झाला आहे.
GDP growth | पुढील 6 महिन्यात विकास दर वाढण्यासाठी पूरक परिस्थिती – गव्हर्नर संजय मल्होत्रा
यामुळे दुहेरी कर टाळला जातो. त्याचबरोबर दोन्ही देशातील व्यापार्यांचे परस्परांशी संबंध वाढतात. यामुळे दोन्ही देशा दरम्यानचा व्यापाराचा वेग वाढण्यास मदत होते असे गोयल यांनी सांगितले. या क्षेत्रातील अनावश्यक नियम रद्द करण्यात येत आहेत. इतर देशाप्रमाणे भारताचे आयात -निर्यात धोरण उदार केले जात आहे असे ते म्हणाले.





