IND A vs AUS A : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘ए’ ची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद..

IND A vs AUS A : भारतीय महिला निवड समितीने रविवारी भारत अ महिलांच्या आगामी बहु-स्वरूपातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. भारत अ महिला संघ तीन T20 आणि तीन 50 षटकांचे सामने खेळेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध 4 दिवसांचा सामना खेळेल. भारतीय महिला अ संघाचा दौरा 7 ऑगस्टपासून ॲलन बॉर्डर फील्ड (ABF), ब्रिस्बेन येथे सुरू होईल. जिथे तीन टी-२० सामने खेळवले जातील. यानंतर मॅकेमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. याशिवाय चार दिवसांचा सामनाही खेळवला जाणार आहे.
मीनू मणी टीम इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे.तर श्वेत सहरावत ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मीनू मणी हीने टीम इंडियाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 टी 20 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. तसेच मीमूने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मीनू डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलंय. भारत अ महिला संघात उमा छेत्री आणि शिप्रा गिरी यांना यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. टीम सायक इशाक, मेघना सिंग आणि सजना सजीवन या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली आहे.
भारतीय संघ : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा छेत्री (यष्टीरक्षक), शिप्रा गिरी (यष्टीरक्षक), रघवी बिश्त, सायका इशाक. , मन्नत कश्यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील*, एस. यशश्री.
स्टँडबाय खेळाडू : सायमा ठाकोर
भारत अ महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
T20 मालिका
पहिला T20 सामना- 7 ऑगस्ट
दुसरा T20 सामना- 9 ऑगस्ट
तिसरा T20 सामना- 11 ऑगस्ट
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना- 14 ऑगस्ट
दुसरा एकदिवसीय सामना- 16 ऑगस्ट
तिसरा एकदिवसीय सामना- 18 ऑगस्ट
22 ऑगस्टला चार दिवसीय सामना खेळवला जाणार आहे.





