Minister List : रायगडमध्ये भरत गोगावले, बीडमध्ये सुनेत्रा पवार; पुण्यात कोण करणार ध्वजारोहण? वाचा संपूर्ण यादी
Minister List : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारने मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

Minister List : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारने मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चेलाही पुन्हा उधाण आले आहे. रायगडमध्ये यंदा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या गोगावले यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (Minister List)
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार असून, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहण करतील. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. (Minister List)
रायगडमध्ये गोगावले, आदिती तटकरे कुठे?
गेल्या काही वर्षांपासून रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत होते. मात्र यंदा रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना कोकण विभागीय कार्यालयात ध्वजारोहणाचा मान मिळणार आहे. (Minister List)
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये यापूर्वी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. भरत गोगावले हे या पदासाठी इच्छुक होते. मात्र, रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. (Minister List)
आता स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे गोगावले यांच्याकडेच रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली जाणार का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. (Minister List)
मात्र पालकमंत्रीपदाचा अधिकृत निर्णय अद्याप नाही
दरम्यान, केवळ ध्वजारोहणाच्या यादीत भरत गोगावले यांचे नाव असल्याने त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. पालकमंत्रीपदाबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम आहे. (Minister List)
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार, याची उत्सुकता होती. सरकारने जाहीर केलेल्या यादीमुळे आता या कार्यक्रमांचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Minister List)





