“एआयएसएसएमएस”तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे : ऑल इंडीया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) विविध शाखांमार्फत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकडुन रायफलसह मानवंदना देण्यात आली व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या रितीने परेडचे सादरीकरण केले.
इयत्ता ११ वी कॉमर्स मधील अमृता माडे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्यदिनावर प्रोत्साहनात्मक व स्फूर्तीदायी विचार व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतेही सादर केली. संस्थेचे खजिनदार अजय पाटील यांच्या हस्ते व रोटरी क्लब, पुणेचे गव्हर्नर शितल शहा यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेच्या कारभारी मंडळाचे अध्यक्ष ॲड.भगवानराव साळुंखे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सभासद दिलीप उंबरकर, अशोक मोडक, निखिल खणसे, धवल जितकर, राजकुमार पाटील, राहुल यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.





