प्रभात वृत्तसेवा इंदापूर – राज्याचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,कित्येक वर्षांपासून इंदापूर पंचायत समितीची सत्ता राहिली आहे. परंतु काही दिवसावर येऊन ठेपलेल्या,पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची गणिते विचित्र झाल्याने,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा नवा प्लॅन आखला असून,हा नवा प्लॅन कोणा कोणाला हादरा देणार का ? याची चर्चा इंदापूर तालुक्यातील गावोगावी रंगली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दीपावलीचा सण पार पडताच, इंदापूर तालुक्यासह राज्यभर राजकीय फटाके वाजणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती या निवडणुका नगरपरिषदेच्या,नगरपालिकेच्या अगोदर पूर्ण होतील.अशी शक्यता आहे. इंदापूर तालुक्यात पंचायत समितीसाठी सोळा (गण) जागा असून,अनुसूचित जातीसाठी सभापतीपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येने मोठे असणारा मराठा,धनगर व इतर समाज पंचायत समितीच्या निवडणुकीकडे पाहिजे त्या प्रमाणात पाहणार नाही. असे असले तरी देखील,राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बाले किल्लातील वालचंदनगर, लासुर्णे, सणसर या तिन्ही गणात, पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडून आलेल्या उमेदवाराला लॉटरी लागणार आहे. यावर मात करण्यासाठी,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नव्याने राजकीय प्लॅनिंग केले असून,आपली कमांड असलेल्या मतदार संघातून,सर्वसाधारण जागेवर अनुसूचित जातीच्या उमेदवाराला संधी देऊन,विक्रमी मताने निवडून आणायचे व आपल्या विचाराचा,पंचायत समितीच्या सभापती पदाचा मान,येणाऱ्या निवडणुकीत सोडायचा नाही.असे राजकीय गणित बसविण्याच्या परफेक्ट हालचाली सुरू आहेत. त्यामुळे काटी गण,लुमेवाडी गण सर्वसाधारण आहे. या दोन गणापैकी एका गणातून अनुसूचित जातीचा उमेदवार देण्याच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. मागील कित्येक वर्षापासून,जिल्हा परिषदेच्या जागा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापेक्षा जास्त आल्या.परंतु पंचायत समिती मात्र हर्षवर्धन पाटील यांच्याच आज विचारांची राहिली. त्यामुळे पंचायत समितीवर समितीवरील पकड हर्षवर्धन पाटील सहजासहजी सोडणार नाहीत.हे मात्र नक्की. तालुक्यांत विचित्र आघाडी होणार का ? पंचायत समिती,जिल्हा परिषद नगरपालिका,या निवडणुका काही दिवसातच वाऱ्याच्या वेगाने होणार आहेत. इंदापूर विधानसभेला तिरंगी झाली,यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणेविजय ठरले,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप नेते प्रवीण माने एकत्र असते तर वेगळे चित्र पाहण्यांस मिळाले असते. हे गावागावातील कार्यकर्त्यांना कळाले आहे.जर प्रवीण माने व हर्षवर्धन पाटील एकत्र आले तर,जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर निवडणुका सोप्या नाहीत.त्यामुळे स्थानिक पातळीवर हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने एकत्र येतील, अशी चर्चा रंगली आहे.