Vaibhav Suryavanshi : संजू सॅमसनच्या वादळी खेळीवर वैभव सूर्यवंशी फिदा; इन्स्टावर स्टोरी शेअर करत केली खास मागणी
Vaibhav Suryavanshi : संजूच्या या खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्व भारावून गेले असतानाच, आयपीएलमधील त्याचा सहकारी आणि उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी याने संजूचे खास अभिनंदन केले आहे.

Vaibhav Suryavanshi Insta story for Sanju Samson : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’मध्ये संजू सॅमसनने वादळी खेळीच्या जोरावर भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिले. संजूच्या या खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्व भारावून गेले असतानाच, आयपीएलमधील त्याचा सहकारी आणि उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी याने संजूचे खास अभिनंदन केले आहे. वैभवने संजूची ही खेळी ‘एक्स्ट्रा स्पेशल’ असल्याचे सांगत आपल्या लाडक्या ‘संजू भैय्या’कडे एक अनोखी मागणीही केली आहे.
“एक्स्ट्रा स्पेशल भैय्या!” वैभवची भावूक पोस्ट
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात भावासारखे अतूट नाते निर्माण झाले आहे. संजूने कठीण परिस्थितीत सलामीला येत भारताला विजय मिळवून दिल्याचे पाहून वैभवचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर संजूचा फोटो पोस्ट करत “एक्स्ट्रा स्पेशल भैय्या” (Extra Special Bhaiya) असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयपीएल २०२६ पूर्वी वैभवची ‘बॅट’साठी मागणी –
View this post on Instagram
संजू सॅमसनने जरी मागील हंगाम राजस्थान रॉयल्समध्ये वैभवसोबत खेळला असला, तरी आयपीएल २०२६ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळताना दिसणार आहे. चेन्नईने संजूला राजस्थानकडून ट्रेड केले आहे. संजू राजस्थान संघातून निरोप घेत असतानाच वैभवने त्याच्याकडे एक खास मागणी केली होती. वैभवने सोशल मीडियाद्वारे संजूला विनंती केली होती की, “मला नेहमी तुझी बॅट देत राहा”.
मैदानावर संजू, तर मुंबईत वैभवचा जलवा –
सध्या संजू सॅमसन विश्वचषकाच्या रणसंग्रामात व्यस्त असून भारताला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी मुंबईत ‘डीवाय पाटील’ (DY Patil) स्पर्धेत आपला खेळ उंचावत आहे. आयपीएल २०२६ दरम्यान जेव्हा या दोन भावांची मैदानात भेट होईल, तेव्हा संजू आपल्या या छोट्या भावाची बॅटची मागणी नक्कीच पूर्ण करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.






