IND W vs WI W 2nd ODI : हरलीन देओलची शतकी खेळी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजसमोर ठेवलं भलंमोठं लक्ष्य…

IND W vs WI W 2nd ODI : भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना वडोदराच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या एका फलंदाजाची शतकी खेळी पाहायला मिळाली. या खेळाडूने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. ही खेळाडू 2019 पासून भारतीय एकदिवसीय संघाचा भाग आहे, परंतु त्यापूर्वी तिला 100 धावांचा आकडा कधीच स्पर्श करता आला नव्हता.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 358 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येची बरोबरी केली. याआधी संघाने 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध दोन गडी गमावून 358 धावा केल्या होत्या.
Innings Break!#TeamIndia post a mammoth total of 358/5 in their innings with some top notch batting display 🔥
Over to our bowlers 👊
Updates ▶️ https://t.co/u2CL80qolK#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7w3TgUHaQS
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2024
वास्तविक, भारतीय फलंदाज हरलीन देओलने स्फोटक कामगिरी करत मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. तिने 103 चेंडूंचा सामना करत 115 धावांची खेळी खेळली. यादरम्यान हरलीन देओलने एकूण 16 चौकार मारले आणि 111.65 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हरलीनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने 350 धावांचा टप्पा पार केला. तिच्यासोबत प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनीही चांगली फलंदाजी केली.
तिच्यासोबत प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांनीही चांगली फलंदाजी केली. प्रतिकानं 86 चेंडूत 10 चौकार अन् 1 षटकारासच्या मदतीने 76 तर स्मृतीने 47 चेडूंत 7 चौकार अन् 2 षटकारासह 53 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्सनं (36 चेडूंत 52), कर्णधार हरमनप्रीत कौरनं (18 चेडूंत 22) धावांचे योगदान दिले. तर ऋचा घोष 13 आणि दीप्ति शर्मा 4 धावा करून नाबाद राहिली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जेडा जेम्स, डिआंड्रा डॉटिन, कियाना जोसेफ आणि ॲफी फ्लेचर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.





