U19 Women’s T20 World Cup 2025 | भारतीय संघाची घोषणा, निक्की प्रसाद अन् सानिका चाळकेवर सोपविली मोठी जबाबदारी….

U19 Women’s T20 World Cup 2025 India squad : पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारताने मंगळवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने निक्की प्रसादकडे संघाचे नेतृत्व दिले असून सानिका चाळके उपकर्णधार असेल.
निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये आयुषी शुक्लालाही स्थान मिळाले आहे. आशिया कपमध्ये आयुषीने घातक गोलंदाजी केली होती. तिच्यासोबत जी त्रिशा आणि कमलिनी हे देखील टीमचा भाग आहेत.
🚨 News 🚨
India’s squad for ICC Under-19 Women’s T20 World Cup 2025 announced#TeamIndia | Details 🔽
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2024
या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये गतविजेत्या भारतासह यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघाचा समावेश करण्यात आला आहे. भारत 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर तो मलेशिया (21 जानेवारी) आणि श्रीलंकेविरुद्ध (23 जानेवारी) सामने खेळणार आहे.
19 ते 23 जानेवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये सहा संघांचे दोन गट असतील. सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 31 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम लढत 2 फेब्रुवारीला होणार आहे.
भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस. (अतिरिक्त खेळाडू : नंदना एस, इरा जे, अनाडी टी.)





