IND W vs SA W : भारतीय संघाकडे ऐतिहासिक संधी! विजेतेपद पटकावताच BCCI कडून मिळणार ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम

IND W vs SA W BCCI likely to award 125 crore to Indian Team : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलिया पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली असून, टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. संघाच्या स्पर्धेतील कामगिरीत चढ-उतार दिसले, तरी महत्त्वाच्या सामन्यांत विजय मिळवून त्यांनी अंतिम फेरी गाठली. आता भारतीय संघाकडे 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून प्रथमच वनडे विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने विजेतेपद पटकावल्या आयसीसीकडून मोठी बक्षीस रक्कम मिळेल. मात्र, बीसीसीआयकडून आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस मिळणार आहे.
भारतीय महिला संघाला मिळणार 125 कोटी रुपयांच बक्षीस –
बीसीसीआयने 2024 मध्ये भारतीय पुरुष संघाने टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यावर 125 कोटी रुपयांची रोख बक्षीस रक्कम जाहीर केली होती. माजी बीसीसीआय सचिव आणि सध्याचे आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी महिला व पुरुष संघांना समान वेतन देण्याचे जाहीर केले होते. ज्यानंतर सर्व खेळाडूंना समान सामना शुल्क दिले जाते. आता बीसीसीआय महिला संघाला वनडे विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यास पुरुष संघाच्या टी-२० विश्वचषक विजयाइतकीच बक्षीस रक्कम देण्याचा विचार करत आहे.
📍 Navi Mumbai
The #WomenInBlue are Geared 🆙 for the #CWC25 Final!#TeamIndia | @ImHarmanpreet pic.twitter.com/fnGRS1cNXm
— BCCI Women (@BCCIWomen) November 1, 2025
न्यूज एजेंसी पीटीआयच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने निनावी राहण्याच्या अटीवर सांगितले की, बोर्ड पुरुष व महिला यांच्यासाठी समान वेतनाला पाठिंबा देत असल्याने, जर आमच्या मुली विश्वचषक जिंकल्या तर बक्षीस रक्कम पुरुषांच्या विश्वचषक विजयाच्या तुलनेत कमी नसेल, अशी बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, ट्रॉफी जिंकण्यापूर्वी घोषणा करणे योग्य नाही.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान –
आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होईल, ज्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंड संघाला एकतर्फी 125 धावांनी पराभूत केले. आफ्रिकन संघाची लीग टप्प्यातील कामगिरीही उत्तम होती, ज्यात 7 पैकी फक्त 2 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाविरुद्धच्या लीग टप्प्यातील सामन्यात एकेकाळी आफ्रिकन संघाचा पराभव निश्चित दिसत होता, मात्र नादिने डी क्लर्कच्या नाबाद 84 धावांच्या उत्कृष्ट खेळीने त्यांच्या संघाला 3 गडी राखून विजय मिळवून दिला.





