India Women vs Australia Women One-Off Test Day 2 Stumps | ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली मालिका, म्हणजेच एकमेव कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला 219 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 376 धावा केल्या होत्या. सध्या पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा क्रीजवर आहेत. दीप्तीने 147 चेंडूंचा सामना करताना नाबाद 70 धावा केल्या. पूजा वस्त्राकर 33 धावा करून नाबाद राहिली. त्यापूर्वी जेमिमाह रॉड्रिग्ज, स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनीही अर्धशतके झळकावली.
Another excellent day on the field! 👏
Deepti Sharma (70*) & Pooja Vastrakar (33*) take #TeamIndia to 376-7, with a first innings lead of 157 runs at the end of Day 2 💪
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1cooBBvnZy
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2023
भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधना सलामीला आल्या. स्मृतीने 106 चेंडूंचा सामना करत 74 धावा केल्या. शफालीने 40 धावा केल्या. तिने 59 चेंडूंचा सामना करत 8 चौकार मारले. स्नेह राणा 9 धावा करून बाद झाली. रिचा घोषने 104 चेंडूंचा सामना करत 52 धावा केल्या. जेमिमाने 121 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. तिच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता.
कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही. तिला गार्डनरने शून्यावर बाद केले. विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटियाही स्वस्तात बाद झाली. 1 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर तिला गार्डनरने बाद केले. दीप्ती नाबाद राहिली. तिने 147 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. पूजाने 115 चेंडूंचा सामना करत नाबाद 33 धावा केल्या. पूजाच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत गार्डनरने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले. तिने 41 षटकांत 100 धावा दिल्या आणि 7 मेडन षटके टाकली. किम गर्थने 10 षटकात 49 धावा देत एक विकेट घेतली. जेस जॉन्सनने 18 षटकात 42 धावा देत 1 बळी घेतला. अॅलिस पेरीला एकही यश मिळाले नाही. ताहिला मगराथने 10 षटकात 22 धावा दिल्या. तिने 2 मेडन षटकेही टाकली. अलाना किंगने 19 षटकात 69 धावा दिल्या. तिलाही यश मिळाले नाही.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव…
AUS-W Vs IND-W 1st Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे Team India चे वर्चस्व…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला. बेथ मूनीने 40, ताहिला मॅकग्राने 50 आणि कर्णधार अॅलिसा हिलीने 38 धावा केल्या. याशिवाय किम गर्थ 28 धावा करून नाबाद राहिली. सदरलँड 16 धावा केल्यानंतर, गार्डनर 11 धावा केल्यानंतर, जोनासेन 19 धावा केल्यानंतर, लॉरेन चीटल सहा धावा केल्यानंतर आणि अलाना किंग पाच धावा करत बाद झाले. फोबी लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही, तर एलिस पेरी चार धावा करून बाद झाली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार विकेट घेतल्या. तर स्नेह राणाने तीन गडी बाद केले. दीप्ती शर्माने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 219 धावा. भारत पहिला डाव – 119 षटकांत 7 बाद 376 धावा. (स्मृती मानधना 74, जेमिमा रॉड्रीक्स 73, रिचा घोष 52, शेफाली वर्मा 40, दीप्ती शर्मा खेळत आहे 70, पुजा वस्त्रकार खेळत आहे 11, अश्ले गार्डनर 4-100)