IND W vs AUS W : भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यात दोन्ही संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या कारण

IND W vs AUS W Semi-Final Black Armbands Tribute : महिला वनडे विश्वचषक २०२५ मधील दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय संघ गोलंदाजीने सुरुवात करणार आहे. या उपांत्य सामन्यादरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. यामागचे कारण अत्यंत दुःखद आहे.
नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २९ ऑक्टोबर रोजी एका १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटूला खेळ.ताना जीवघेणी दुखापत झाली होती. वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळी या तरुण क्रिकेटपटूच्या मानेवर चेंडू लागला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला मोनाश मेडिकल सेंटरमध्ये लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते, जिथे तो मृत्यूशी झुंज देत होता.
The thoughts of the entire cricketing community are with the loved ones of 17-year-old Ben Austin, who has passed away after a tragic accident at cricket training: https://t.co/r0ZDYvbqRK pic.twitter.com/sAx74AoQuv
— cricket.com.au (@cricketcomau) October 30, 2025
खेळाडूंनी का बांधली काळी पट्टी?
दुर्दैवाने, हा १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, बेन ऑस्टिन याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट शेअर करून त्याच्या निधनाची बातमी दिली. याच बेन ऑस्टिनला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, दोन्ही संघांचे सर्व खेळाडू तसेच पंचही या उपांत्य सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत.
हेही वाचा – श्रेयस अय्यरची हेल्थ अपडेट समोर; स्वत: पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही संघांनी मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार एलिसा हिलीपरतली असून, जॉर्जिया वेयरहमच्या जागी सॉफी मॉलिन्यू खेळणार आहे. तर भारतीय संघात शफाली वर्मा, क्रांती गौड आणि रिचा घोष यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे उमा छेत्री आणि हरलीन देओल यांना संघाबाहेर बसावे लागले आहे.





