श्रेयस अय्यरची हेल्थ अपडेट समोर; स्वत: पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

Shreyas Iyer Injury Updates | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अलेक्स कॅरीचा झेल घेताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, अय्यर आता धोक्याबाहेर आहे. इतकेच काय तर स्वत: श्रेयसने त्याच्या प्रकृतीची अपडेट सोशल मिडियावर शेअर केली आहे.
श्रेयस अय्यरची पोस्ट –
श्रेयस अय्यरने एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “माझी प्रकृती आता सुधारत आहे. दिवसेंदिवस मी अधिक तंदुरूस्त होत आहे. तुम्हा सर्वांनी मला दाखवलेला पाठिंबा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना याने मी भारावून गेलो आहे. तुम्ही सर्वजण माझी इतकी काळजी करता हे पाहून मला खूप समाधान वाटलं. माझे फॅन्सचे प्रेम हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केलेल्या सदिच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद!” असे म्हणत त्याने काळजी व्यक्त केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) October 30, 2025
कशी झाली दुखापत?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यादरम्यान ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन डावाच्या 34व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीचा झेल पकडताना श्रेयसच्या बरगड्यांना दुखापत झाली. बॅकवर्ड पॉइंटवर क्षेत्ररक्षण करताना मागे धावत जाऊन त्याने हा झेल घेतला, परंतु यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. Shreyas Iyer Injury Updates |
दुखापतीमुळे तो वेदनेने विव्हळत मैदानावरच पोट आणि छाती धरून बसला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला तातडीने मैदानाबाहेर नेले आणि सिडनीच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, आता अय्यर आयसीयूबाहेर आला असून डॉक्टरांच्या देखरेखित त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. Shreyas Iyer Injury Updates |
हेही वाचा:





