IND vs ZIM 3rd T20 : टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाच्या Playing 11 मध्ये मोठे बदल…

IND vs ZIM 3rd T20 (Playing XI Update) : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाचा मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
तत्पूर्वी झालेला नाणेफकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झिम्बाब्वे संघ क्षेत्ररक्षणासाठी प्रथम मैदानात उतरेल.
India won the toss and opted to bat in the third #ZIMvIND T20I 🏏 pic.twitter.com/pF0zHnDLI1
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 10, 2024
या सामन्यात संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे खेळताना दिसणार आहेत. मुकेश कुमारच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला आहे. इनोसेंट काइया दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. त्यांच्या जागी मारुमणीला संधी देण्यात आली आहे. ल्यूक जोंगवेही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. अशाप्रकारे झिम्बाब्वेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.
IND vs ZIM : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.
झिम्बाब्वे : तदिवनाशे मारुमणी, वेस्ली माधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
दरम्यान, या मालिकेतीलहा आजचा तिसरा सामना असून भारतानं आघाडी घेतली तर झिब्वाब्वे संघावर दडपण येईल. त्यामुळे मालिका विजयाचीही संधी भारतीय संघासमोर उभी राहील. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती त्यामुळे झिम्बाब्वेने टी-20 मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला होता.
मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाने हा सामना 100 धावांनी जिंकला होता. अभिषेक शर्माने स्फोटक कामगिरी करत भारताकडून शतक झळकावले. आता झिम्बाब्वेचा संघ नव्या रणनीतीने मैदानात उतरू शकतो. सिकंदर रझा कर्णधार असलेल्या संघासाठी तिसरा सामना आव्हानात्मक असू शकतो.





