IND vs ZIM 3rd T20 : टीम इंडियाला आघाडी घेण्याची संधी, झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार तिसरा टी-20 सामना…

IND vs ZIM 3rd T20 :- पहिला टी-20 सामना गमावल्यानंतर भारताने उलटफेर करत झिब्वाब्वेचा दुसऱ्या लढतीत १०० धावांनी विजय मिळवला व ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता आज होत असलेल्या तिसऱ्या टी-२० लढतीत आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी आहे.
दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने तडफदार शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीच संघाला द्विशतकी मजल मारता आली. या सामन्यात यजमान झिब्वाब्वेचा संघ अवघ्या १३४ धावाच करु शकला. भारताचे मुख्य खेळाडू या मालिकेत नसल्यामुळे नवोदितांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची नामी संघी आहे. अभिषेक शर्माने शतक फटकावत या संधीचे सोने केले.
ऋतुराज गायकवाड व रिंकू सिंग यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. मात्र, साइ सुदर्शऩ, रियान पराग यांना अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे ते कशी कामगिरी करतात याकडे लक्ष राहणार आहे. पहिल्या लढतीत भारतीय संघाची गोलंदाजी अगदीच सामान्य वाटली. दुसऱ्या सामन्यात सुधारण झाली. मात्र, आता तिसऱ्या लढतीत त्यांच्याकडूनही अचुक गोलंदाजीची अपेक्षा आहे.
या मालिकेतीलहा तिसरा सामना असून आघाडी घेतली तर झिब्वाब्वे स्ंघावर दडपण येइल. त्यामुळे मालिका विजयाचीही संधी भारतीय संघासमोर उभी राहील. मुकेश कुमार, आवेश खान व रवी बिष्णोई यांच्याकडून खुप अपेक्षा आहेत. कर्णधार शुभमन गिल पहिल्या सामन्यात 31 धावावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यातही त्याने निराशाच केली. कर्णधारपद असाताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
Team India : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक, जय शाहांनी केली मोठी घोषणा…
तिसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन हे भारतीय कॅम्पमध्ये पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचे संयोजन लक्षणीय बदललेले दिसून येईल.





