IND vs WI : राहुल, जुरेल आणि जडेजाचे वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार शतक, १८ वर्षांनंतर घडला असा पराक्रम

IND vs WI 1st Test 2nd day 3 batters century : नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी (3 ऑक्टोबर 2025) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या डावात 5 गडी गमावून 448 धावा केल्या. यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 286 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून सलामीवीर केएल राहुल (100), यष्टीरक्षक ध्रुव जुरेल (125) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद 104) यांनी शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. 2025 मध्ये भारताकडून एका डावात तीन फलंदाजांनी शतक ठोकण्याची ही तिसरी वेळ आहे.
चौथ्यांदा तीन शतकांचा विक्रम –
केएल राहुलने 197 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 100 धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने 210 चेंडूंमध्ये 125 धावांची खेळी करत कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. रवींद्र जडेजाने 176 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या. यंदा तिसऱ्यांदा एकाच डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतके ठोकली. यापूर्वी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी, तर मॅनचेस्टर येथे शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी शतके झळकावली होती. 1979, 1986 आणि 2007 नंतर 2025 हे चौथे वर्ष आहे, जेव्हा भारतात एका कॅलेंडर वर्षात एका डावात तीन किंवा त्याहून अधिक फलंदाजांनी शतके केली.
Hundreds galore 💯
KL Rahul’s 1⃣0⃣0⃣, Dhruv Jurel’s 1⃣2⃣5⃣, and Ravindra Jadeja’s 1⃣0⃣4⃣* leads #TeamIndia‘s charge!#INDvWI | @IDFCFIRSTBank | @klrahul | @dhruvjurel21 | @imjadeja pic.twitter.com/CProc5qzcL
— BCCI (@BCCI) October 3, 2025
वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्टात –
वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या 162 धावांवर संपुष्टात आला. भारताने पाच गडी शिल्लक ठेवून 286 धावांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली. 24 वर्षीय ध्रुव जुरेलने 116व्या षटकात वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेस याच्याविरुद्ध चौकार ठोकत 190 चेंडूंमध्ये पहिले कसोटी शतक पूर्ण केले. जडेजाने 10 षटकांनंतर वारिकन याच्याविरुद्ध एक धाव घेत 168 चेंडूंमध्ये आपले सहावे कसोटी शतक साजरे केले.
हेही वाचा – Sana Mir Controversy : सना मीरच्या टिप्पणीने खळबळ! काश्मीर उल्लेखावर सोशल मीडियावर वाद, स्पष्टीकरण केले जारी
जडेजाने मोडला धोनीचा षटकारांचा विक्रम –
रवींद्र जडेजाने (79) या खेळीत महेंद्रसिंग धोनीचा कसोटीमधील 78 षटकारांचा विक्रम मोडला. आता रोहित शर्मा (88), वीरेंद्र सेहवाग (90) आणि ऋषभ पंत (90) यांनाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. भारताने या सामन्यात मजबूत पकड मिळवली असून, वेस्टइंडीजसमोर मोठे आव्हान आहे.





