Sana Mir Controversy : सना मीरच्या टिप्पणीने खळबळ! काश्मीर उल्लेखावर सोशल मीडियावर वाद, स्पष्टीकरण केले जारी

Sana Mir Comment Controversy : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधार आणि सध्याच्या समालोचक सना मीर यांच्या एका टिप्पणीने सोशल मीडियावर वाद पेटला आहे. सामन्यादरम्यान समालोचन करताना सना मीर यांनी पाकिस्तानच्या फलंदाज नतालिया परवेझ यांचा उल्लेख ‘काश्मीर’मधून आलेली खेळाडू असा केला आणि तात्काळ वक्तव्य सुधारत ‘आझाद काश्मीर’ असा उल्लेख केला.
सना मीर यांचे सोशल मीडियावर स्पष्टीकरण –
या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि सना मीर यांच्यावर खेळाचे राजकारण करण्याचा आरोप करण्यात आला. यानंतर टीकेची झोड उठल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद वाढत असल्याचे पाहून सना मीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले.
It’s unfortunate how things are being blown out of proportion and people in sports are being subjected to unnecessary pressure. It is sad that this requires an explanation at public level.
My comment about a Pakistan player’s hometown was only meant to highlight the challenges… pic.twitter.com/G722fLj17C
— Sana Mir ثناء میر (@mir_sana05) October 2, 2025
त्यांनी लिहिले की, त्यांचा कोणत्याही प्रकारची राजकीय टिप्पणी करण्याचा हेतू नव्हता. त्यांचा उद्देश फक्त नतालिया परवेझ यांच्या पार्श्वभूमी आणि त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. “मी फक्त नतालिया यांनी विशिष्ट क्षेत्रातून येऊन किती आव्हानांचा सामना केला आणि त्या यशस्वीपणे कशा पुढे आल्या हे सांगण्याचा प्रयत्न केला. समालोचनात आम्ही खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासाला हायलाइट करतो,” असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – IND vs WI : रवींद्र जडेजाचा अहमदाबादमध्ये जलवा; धोनीच्या शतकी रेकॉर्डशी केली बरोबरी!
‘राजकारणाशी कोणताही संबंध नाही’ –
सना मीर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी सामन्यादरम्यान दोन अन्य खेळाडूंच्या मूळ गावांचाही उल्लेख केला होता. त्यामुळे फक्त एका खेळाडूच्या उल्लेखावरून राजकारण करणे चुकीचे आहे. त्या म्हणाल्या, “मी आज आणखी दोन खेळाडूंच्या गावांचा उल्लेख केला होता. कृपया याला राजकारणाशी जोडू नका. एक समालोचक म्हणून आमचे काम खेळाडूंच्या मेहनतीच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, त्यांना कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि त्यांच्या मनात कोणाबद्दलही वाईट भावना नाहीत.
हेही वाचा – IND vs WI : ध्रुव जुरेलने ठोकले पहिले कसोटी शतक! वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा भारतीय
संशोधन स्रोताचा उल्लेख आणि पुरावा –
सना मीर यांनी सांगितले की, त्यांनी वापरलेली माहिती एका संशोधन स्रोतावरून घेतली होती, जी आता बदलण्यात आली आहे. त्यांनी या स्रोताचा स्क्रीनशॉट देखील आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केला आहे. या वादामुळे सना मीर यांच्या टिप्पणीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून त्यांचा हेतू केवळ खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या सांगण्याचा होता, हे स्पष्ट होते.





