IND vs SL 1st ODI : निसांका-वेल्लालगेची अर्धशतके, श्रीलंकेनं भारतासमोर ठेवलं माफक लक्ष्य…

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना कोलंबोमध्ये खेळवला जात आहे. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेविरूध्दची तीन टी-20 सामन्यांच्या मालिका 3-0 ने जिंकली आहे. दरम्यान, पथुम निशांका आणि दुनिथ वेलालगे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या वनडेत भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 101 धावांवरच त्यांनी पाच विकेट गमावल्या होत्या. मात्र, आधी निशांका आणि नंतर वेलालगे यांनी शानदार अर्धशतके झळकावत श्रीलंकेचा डाव सावरला आणि भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावापर्यंत मजल मारली.
Innings Break!
A fine bowling effort from #TeamIndia restricts Sri Lanka to 230/8.
Stay tuned for the chase! ⏳
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#SLvIND pic.twitter.com/gpbB53j2NE
— BCCI (@BCCI) August 2, 2024
श्रीलंकेच्या सहाव्या ते नवव्या फळीतील फलंदाजांनी मिळून एकूण 123 धावा जोडल्या. यामध्ये दुनिथ वेलालगे 65 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली तर पथुम निसांकाने 75 चेंडूत 9 चौकारासह 56 धावांची खेळी केली. जनिथ लियानागेने 20 ,वानिंदु हसरंगाने 24 आणि अकीला धनंजय याने 17 धावांचे योगदान दिले. कर्णधार चरिथ असलंका केवळ 14 धावा करू शकला.
भारताने या सामन्यात 7 गोलंदाजांचा वापर केला, त्यापैकी 6 गोलंदाजांनी किमान एक विकेट घेतली. अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, पण सर्वात महत्त्वाची विकेट शिवम दुबेने घेतली, ज्याने 56 धावांवर पथुम निसांकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. निसांका खूप चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसत होते, पण मोठी धावसंख्या गाठण्यापूर्वीच त्याने आपली विकेट गमावली. मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





