IND vs SL : भारतीय महिला संघाने पटकावले तिरंगी मालिकेचे जेतेपद, श्रीलंकेचा उडवला धुव्वा

Tri Nation Series 2025 IND vs SL Final Highlights : भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करत तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या फायनल सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर ७ बाद ३४२ धावाचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंका संघ ४८. षटकांत २४५ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाने या मालिकेत एकूण पाच सामने खेळले, त्यापैकी चार सामने जिंकले आणि ट्रॉफीवर कब्जा केला.
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पुन्हा एकदा भारताला चांगली सुरुवात करून दिली. प्रतिकाने ३० धावा केल्या, तर स्मृती मानधनाने शतक झळकावले. तिने १०१ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांसह ११६ धावा केल्या. हे तिचे एकदिवसीय क्रिकेटमधील ११ वे शतक होते. यासह, ती एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारी तिसरी महिला फलंदाज बनली आहे.
Victory by 9⃣7⃣ runs in the Final 🙌
Congratulations to #TeamIndia as they beat Sri Lanka to win the #WomensTriNationSeries2025 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#INDvSL pic.twitter.com/U1YCGD9Uw3
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
स्मृती मानधनाने झळकावले शतक –
For her scintillating ton in the final, vice-captain Smriti Mandhana receives the Player of the Match award 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#TeamIndia | #WomensTriNationSeries2025 | #INDvSL | @mandhana_smriti pic.twitter.com/fGPmzxoJ5d
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
स्मृती मानधना व्यतिरिक्त हरलीन देओल, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही शानदार फलंदाजी केली. हरलीनने ४७ धावांचे योगदान दिले, हरमनप्रीतने ४१ धावांचे योगदान दिले आणि जेमिमाने ४४ धावांचे योगदान दिले. यानंतर, दीप्ती शर्माने नाबाद २० धावा करत डाव संपवला, ज्यामुळे टीम इंडियाला ५० षटकांत ७ गडी गमावून ३४२ धावा करता आल्या. तर श्रीलंकेकडून मलाकी मदारा, देवमी विहंगा आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर. इनोका रणवीराला एक विकेट्स मिळाली.
हेही वाचा – Mothers Day 2025 : सचिन-विराटसह रोहित शर्माने खास पोस्ट करत आईच्या ममतेला केला सलाम
स्नेह राणाची शानदार गोलंदाजी –
A sparkling performance with the ball ⚡️⚡️
Congratulations to Sneh Rana on becoming the Player of the series for scalping 1⃣5⃣ wickets in five matches 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#TeamIndia | #WomensTriNationSeries2025 | #INDvSL | @SnehRana15 pic.twitter.com/G1PXoappgU
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
३४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. त्याने खाते न उघडताच पहिली विकेट्स गमावली. पण, कर्णधार चामारी अटापट्टूने अर्धशतक झळकावले, परंतु तिला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही, ज्यामुळे श्रीलंकेचा संघ ४८.२ षटकांत २४५ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून स्नेहा राणा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. स्नेहा राणाने ९.२ षटकांत ३८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, अमनजोत कौरने ३ विकेट्स घेतल्या. श्री चरणी यांनीही १ विकेट्स घेतली.





