IND vs SL : अभिषेक शर्माचा मोठा धमाका! एकाच झटक्यात विराट-रोहितच्या ‘या’ खास विक्रमांची केली बरोबरी

Abhishek Sharma equals Virat and Rohit Records : आशिया कप 2025 च्या सुपर फोरच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अभिषेक शर्माने विस्फोटक खेळी साकारली. त्याने 31 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधलं. या अर्धशतकी खेळीमुळे त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या विक्रमांशी बरोबरी केली. यासह तो आशिया कपमध्ये सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी –
अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा पराक्रम विराट कोहलीने सलग तीन टी-20 सामन्यांमध्ये अर्धशतके ठोकून केला होता. याशिवाय, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी हा पराक्रम प्रत्येकी दोन वेळा केला आहे. आता जर अभिषेकने पुढील सामन्यात अर्धशतक ठोकले, तर तो विराट कोहलीला मागे टाकेल.
रोहित शर्माच्या विक्रमालाही घातली गवसणी –
Stat Alert 🚨 – #TeamIndia opener Abhishek Sharma now has the most runs in a T20 Asia Cup edition 👏👏
He has scored 309 runs so far and becomes the first batter to achieve this feat. pic.twitter.com/xELyd078Kz
— BCCI (@BCCI) September 26, 2025
अभिषेक शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 7 डावांमध्ये 30 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रिझवानने 2021 मध्ये, तर रोहितने 2021-22 मध्ये हा पराक्रम केला होता. अभिषेकने 2025 मध्ये सलग सात डावांमध्ये 30 पेक्षा धावा केल्या असून, पुढील सामन्यात त्याच्याकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल.
हेही वाचा –IND vs SL : अभिषेक शर्माने टी-20 आशिया कपमध्ये रचला इतिहास! मोहम्मद रिझवानलाही टाकलं मागे
आशिया कप 2025 मधील शानदार कामगिरी –
आशिया कप 2025 मध्ये अभिषेक शर्माने अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांच्या 6 डावांमध्ये 51.50 च्या सरासरीने 309 धावा केल्या आहेत. टी-20 आशिया कपच्या एका हंगामात 300 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने या धावा 204 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने केल्या आहेत.
हेही वाचा – ISSF Junior World Cup : भारताच्या युवा नेमबाजांची कमाल! जोनाथनने सुवर्णपदक तर रश्मिकाने पटकावलं रौप्यपदक
गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याच्याकडे शतक ठोकण्याची संधी होती, परंतु तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. आता अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध तो ही लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. अभिषेक शर्माच्या या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने उतरण्याची संधी आहे. क्रिकेटप्रेमींना आता त्याच्या पुढील खेळीची उत्सुकता लागली आहे.





