IND vs SL : अभिषेक शर्माने टी-20 आशिया कपमध्ये रचला इतिहास! मोहम्मद रिझवानलाही टाकलं मागे

अभिषेक शर्माने मोडला मोहम्मद रिझवानचा विक्रम –
अभिषेक शर्माने मैदानावर उतरताच आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत श्रीलंकेच्या गोलंदाजांना हैराण केले. 31 चेंडूंमध्ये 61 धावांची खणखणीत खेळी करताना त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याला चरिथ असलंकाने बादे केले. पंरतु या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावताच टी-20 आशिया चषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडला, ज्याने 2022 च्या टी-20 आशिया कपमध्ये 281 धावा केल्या होत्या.
अभिषेक शर्माने टी-20 आशिया कपमध्ये रचला इतिहास –
🚨 ABHISHEK SHARMA 🚨
FIRST IN HISTORY TO SCORE 300 RUNS IN A SINGLE EDITION OF T20 ASIA CUP 🏏🔥
LEGENDARY. LETHAL. LIMITLESS. ✨🇮🇳#AbhishekSharma #AsiaCup2025#INDvsSL pic.twitter.com/OJrTIIujjn
— Asia Voice 🎤 (@Asianewss) September 26, 2025
अभिषेकने या हंगामात 6 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या असून, तो टी-20 आशिया कपच्या एका हंगामात 300 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तो सध्या सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावले आहे. 6 सामन्यांमध्ये त्याने एकूण 309 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे तो टी-20 आशिया कपच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
अभिषेक शर्माची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेकने आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 844 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघासाठी तो एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. अभिषेक शर्माच्या या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मजबूत पकड मिळवली असून, हा सामना चाहत्यांसाठी खूपच रोमांचक ठरत आहे.





