IND vs SL 2nd T20 : हार्दिक-बिश्नोईचा कहर, श्रीलंकेचे भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य…

IND vs SL 2nd T20 (Score Update) : भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे लक्ष्य 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याचे असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावसंख्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
श्रीलंकेसाठी कुसल परेराने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. परेराने या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर पथुम निसांकानं 24 चेंडूत 32 धावांची खेळी केली. एकवेळ श्रीलंकेच्या संघाने 15 षटकांत 2 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. कुसल परेरा आणि कामिंदू मेंडिस ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहता श्रीलंका 180-190 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होते. मात्र 16व्या षटकात हार्दिक पांड्याने प्रथम मेंडिस (26 धावा) आणि नंतर परेराला(53 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवून यजमान संघाला दुहेरी धक्का दिला. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सलग दोन चेंडूंत दासुन शांका (0)आणि वानिंदू हसरंगाच्या (0) विकेट घेतल्या, पण हॅट्ट्रिक घेण्यापासून तो हुकला. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अवघ्या 31 धावा देत श्रीलंकेला 161 धावांवरच रोखले.
Women’s Asia Cup 2024 : श्रीलंकेने भारताला हरवून रचला इतिहास, प्रथमच पटकावलं आशिया कपचे विजेतेपद…
भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने 4 षटकात 26 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 3 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. अक्षर पटेलने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही 2 बळी घेतले. त्याने 2 षटकात 23 धावा दिल्या.





