IND vs SL 2nd T20 : दुसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा पराभव; भारतानं विजयासह मालिकेत घेतली 2-0 ने आघाडी…

IND vs SL 2nd T20 (Match Result) : भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज पल्लेकेले येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला. त्यामुळे षटके कमी करण्यात आली होती. टीम इंडियाला 8 षटकात 78 धावांचे आव्हान मिळाले होते. टीम इंडियाने 6.3 षटकात तीन विकेट गमावत 81 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.
यादरम्यान यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. सूर्याने 12 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. हार्दिक पांड्याने नाबाद 22 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. रिषभ पंतनेही नाबाद 2 धावा केल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजीत हसरंगा,पथिराना आणि महीश तीक्षणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
#TeamIndia complete a 7 wicket win over Sri Lanka in the 2nd T20I (DLS method) 🙌
They lead the 3 match series 2-0 👍
Scorecard ▶️ https://t.co/R4Ug6MQGYW#SLvIND pic.twitter.com/BfoEjBog4R
— BCCI (@BCCI) July 28, 2024
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावसंख्यापर्यंत मजल मारली होती.
IND vs SL 2nd T20 : हार्दिक-बिश्नोईचा कहर, श्रीलंकेचे भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य…
श्रीलंकेसाठी कुसल परेराने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. परेराने या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर पथुम निसांकानं 24 चेंडूत 32 धावांची खेळी केली. एकवेळ श्रीलंकेच्या संघाने 15 षटकांत 2 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. कुसल परेरा आणि कामिंदू मेंडिस ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहता श्रीलंका 180-190 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होते. मात्र 16व्या षटकात हार्दिक पांड्याने प्रथम मेंडिस (26 धावा) आणि नंतर परेराला(53 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवून यजमान संघाला दुहेरी धक्का दिला.
Paris Olympics 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूनंतर प्रणॉयचीही विजयी सलामी…
पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सलग दोन चेंडूंत दासुन शांका (0)आणि वानिंदू हसरंगाच्या (0) विकेट घेतल्या, पण हॅट्ट्रिक घेण्यापासून तो हुकला. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अवघ्या 31 धावा देत श्रीलंकेला 161 धावांवरच रोखले. भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने 4 षटकात 26 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 3 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. अक्षर पटेलने 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पांड्यानेही 2 बळी घेतले. त्याने 2 षटकात 23 धावा दिल्या.





