IND vs SL 1st T20 : टीम इंडियाची श्रीलंकेवर 43 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वाखाली मिळवला रोमहर्षक विजय…

IND vs SL 1st T20 (Score Update) : भारताचा श्रीलंका दौरा आजपासून सुरू झाला आहे. यासोबतच एका गंभीर युगाचीही सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले येथे खेळवला गेला. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवलं होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत सर्वबाद 170 धावाच करू शकला.
श्रीलंकेसाठी फलंदाजीत पथुम निसांकाने सर्वाधिक 79 धावांची शानदार खेळी केली. 48 चेंडूंचा सामना करताना त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. कुसल मेंडिसने 45 धावांचे तर कुसल परेराने 20 धावांचे योगदान दिले. तर भारताकडून गोलंदाजीत रियान परागने शानदार गोलंदाजी केली. त्याने 1.2 षटकात केवळ 5 धावा देत 3 बळी घेतले. अर्शदीप सिंगने 3 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. अक्षर पटेलनेही 2 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनी 1-1 विकेट घेतली.
A 43-run victory in the first T20I! 🙌#TeamIndia take a 1-0 lead in the series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND pic.twitter.com/zZ9b1TocAf
— BCCI (@BCCI) July 27, 2024
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली. भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 16 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले.
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia! 💪
5⃣8⃣ for Captain @surya_14kumar
4⃣9⃣ for @RishabhPant17
4⃣0⃣ for @ybj_19
3⃣4⃣ for vice-captain @ShubmanGillOver to our bowlers now! 👍
Scorecard ▶️ https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND pic.twitter.com/1KcC7etLU2
— BCCI (@BCCI) July 27, 2024
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने आपल्या शानदार खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय ऋषभ पंतने 33 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. तर रियान परागने 6 चेंडूत 7 धावा केल्या. रिंकू सिंगला 2 चेंडूत 1 धाव करता आली. अक्षर पटेल 5 चेंडूत 10 धावा करून नाबाद परतला.
ENG vs WI 3rd Test : जो रूटने रचला इतिहास, ब्रायन लारासह रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम काढला मोडित….
अशी होती श्रीलंकेच्या गोलंदाजांची अवस्था…
श्रीलंकेसाठी मथिसा पाथिराना सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मथिसा पाथिरानाने 4 षटकात 40 धावा देत 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय दिलशान मधुशंका, असिथा फर्नांडो आणि वानेंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





