IND vs SL 1st T20 : गिल-जैस्वालनंतर सूर्यकुमार अन् पंतची झंझावाती खेळी, टीम इंडियानं श्रीलंकेसमोर ठेवले मोठं लक्ष्य…

IND vs SL 1st T20 (Score Update) : भारताचा श्रीलंका दौरा आजपासून सुरू होत आहे. यासोबतच एका गंभीर युगाचीही सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. नवा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चांगली सुरुवात करायची आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे.
भारताने या सामन्यात श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Innings Break!
A solid batting performance from #TeamIndia! 💪
5⃣8⃣ for Captain @surya_14kumar
4⃣9⃣ for @RishabhPant17
4⃣0⃣ for @ybj_19
3⃣4⃣ for vice-captain @ShubmanGillOver to our bowlers now! 👍
Scorecard ▶️ https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND pic.twitter.com/1KcC7etLU2
— BCCI (@BCCI) July 27, 2024
प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली. भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 16 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने आपल्या शानदार खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय ऋषभ पंतने 33 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. तर रियान परागने 6 चेंडूत 7 धावा केल्या. रिंकू सिंगला 2 चेंडूत 1 धाव करता आली. अक्षर पटेल 5 चेंडूत 10 धावा करून नाबाद परतला.
ENG vs WI 3rd Test : जो रूटने रचला इतिहास, ब्रायन लारासह रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम काढला मोडित….
अशी होती श्रीलंकेच्या गोलंदाजांची अवस्था…
श्रीलंकेसाठी मथिसा पाथिराना सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मथिसा पाथिरानाने 4 षटकात 40 धावा देत 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय दिलशान मधुशंका, असिथा फर्नांडो आणि वानेंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





