IND vs SA – भारतीय संघ आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पर्थ येथील मैदानावर सामना खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामान्यांच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने सूर्यकुमारच्या यादवच्या अर्धशतकाच्या बळावर २० षटकांत १३३ धाव केल्या.
#T20WorldCup2022 | सलग दोन पराभवांनंतर तिसरा सामना पाकिस्ताननं जिंकला
सामन्यात सुरुवातीपासूनच साऊथ आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. कारण भारतीय संघाच्या ४९ धावांवरच ५ गडी बाद झाले होते. यानंतर सूर्यकुमार यादवने भारताच्या डावाला सावरले. मात्र दुसऱ्या बाजूने भारताच्या कोणत्याही फलंदाजाला मैदानावर जास्त वेळ टाकता आले नाही. दिनेश कार्तिककडून मोठ्या अपेक्षा असताना तो फक्त ६ धावांवरच बाद झाला. अफ्रकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडी ४ आणि वेन पार्नेल याने ३ बळी घेतले. तर अॅनरिक नॉरकीयने १ गडी बाद केला.
सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत ४० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ६८ धावांची खेळी खेळली. यानंतर आता भारताने दिलेल्या १३३ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे अफ़्रिएकचा रिले रुसो चांगल्या लयीत असून त्याने मागील सामन्यात शतक ठोकलेले आहे.
.@surya_14kumar scored a cracking half-century & was our top performer from the first innings of the #INDvSA #T20WorldCup clash. 👌 👌 #TeamIndia
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/vMwfHvrNkQ
— BCCI (@BCCI) October 30, 2022
सामन्यातील दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
साऊथ आफ्रिका संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, अॅनरिक नॉरकीय.