T20 WorldCup 2022 – टी-२० विश्वचषकातील २९ वा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात पार्थ येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाने विरोधींवर ६ गडी राखून मात केली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना नेदरलँड्स संघाने २० षटकांत ९ बाद ९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ६ गडी राखून विजय मिळवला.
विराटला साऊथ आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात सचिनचा ‘हा’ मोठा विक्रम मोडण्याची संधी
सामान्यांच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँडच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर नेदरलँड्स संघाचे फलंदाज अपयशी ठरले. नेदरलँड्सने कसेबसे ९२ धावांचे लक्ष्य पाकिस्तान ठेवले. पाकिस्तान कडून गोलंदाजीत शादाब खान याने ३ गडी बाद केले. तर मोहंम्मद वसीम २ आणि शाहीन आफ्रिदी व हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
नेदरलँड्सने दिलेल्या ९१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लवकरच धावबाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फकर जमान यांनी डावाला सावरले. पाकिस्तानने ४ गडी गमावून ९५ धावा केल्या आणि दोन पराभवानंतर स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४९ धावांची खेळी खेळली.
Pakistan register a comprehensive six-wicket win over the Netherlands 👏#NEDvPAK | 📝: https://t.co/QfvtIntJ7C pic.twitter.com/Kv9cqyGCy3
— ICC (@ICC) October 30, 2022