IND vs SA : द. आफ्रिकेने भारताला चारली धूळ! मार्करमच्या वादळी खेळीने विराट-ऋतुराजच्या शतकावर फेरलं पाणी

IND vs SA South Africa beat India by 4 Wickets : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताला ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा मजबूत स्कोअर बोर्डवर लावला होता. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेने एडन मार्क्रमच्या शतक (११० धावा) आणि मॅथ्यू ब्रिट्झके आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४९.२ षटकांत सहा बाद ३६२ धावा करून सामना जिंकला. यासह तीन सामन्यात मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. विशेष म्हणजे विदेशात धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात मोठा विजय ठरला.
विराट-ऋतुराजची विक्रमी भागीदारी –
या सामन्यात विराट कोहलीचे सलग दुसरे शतक (१०२ धावा) आणि ऋतुराज गायकवाडचे कारकिर्दीतील पहिले शतक (१०५ धावा) यांच्या जोरावर भारताने ५ विकेट्स गमावून ३५८ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. कोहली आणि गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १९५ धावांची विक्रमी भागीदारी केली, जी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये या विकेटसाठी भारताची सर्वात मोठी भागीदारी आहे. कर्णधार केएल राहुलनेही अखेरच्या षटकांमध्ये ४३ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६६ धावांची धडाकेबाज खेळी केली.
खराब सुरुवात, पण कोहलीचा फॉर्म कायम –
🚨 MATCH SUMMARY 🚨
2nd ODI : INDIA 🇮🇳 🆚 🇿🇦 SOUTH AFRICA
📍 RaipurMarkram ton trumps Kohli, Gaikwad centuries for nervy win
IND 🇮🇳 358/5(50)
SA 🇿🇦 362/6(49.2)SA 🇿🇦 won by 4 wickets
PoM : Aiden Markram 🇿🇦 [110(98) | 10×4, 4×6 | S/R : 112.24 ] 💯#AidenMarkram #INDvsSA pic.twitter.com/3MN8ebEdRX— Cricket Addiction (@CricketAdd1ct) December 3, 2025
नाणेफेक हारल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, पण संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा (१४) आणि यशस्वी जैस्वाल (२२) लवकर बाद झाले. अशा स्थितीत फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने गायकवाडसोबत मोर्चा सांभाळला. रांचीमध्ये थोडा अडखळलेला गायकवाड या सामन्यात कोहलीच्याच शैलीत खेळताना दिसला. कोहली आणि गायकवाड दोघांनीही स्ट्राइक रोटेट करण्यावर भर दिला. सुरुवातीला थोडासा गोंधळलेला वाटणारा गायकवाड आत्मविश्वास मिळाल्यानंतर आकर्षक शॉट्स खेळू लागला.
हेही वाचा – Tilak Varma : तिलक वर्मामध्ये संचारला सुपरमॅन! बाउंड्रीवर हवेत डाईव्ह मारत अडवला षटकाराचा चेंडू, पाहा VIDEO
ऋतुराजचे पहिले वनडे शतक –
ऋतुराज गायकवाडने केशव महाराजच्या एका षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर त्याने कोर्बिन बॉशच्या षटकात सलग दोन चौकार मारत ७७ चेंडूंमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर लगेचच तो मार्को यानसेनच्या षटकात बाद झाला. कोहलीनेही यानसेनच्या षटकात एक धाव घेत आपले ५३ वे शतक पूर्ण केले, पण तोही लगेच लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर एडेन मार्करमला झेल देऊन बाद झाला. भारताने मोठी धावसंख्या उभारली असली तरी, मार्करमच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली.





