IND vs SA : सहा वर्षांनंतर ईडन गार्डन्सवर कसोटी पुनरागमन; शुबमन गिलच्या संघात ९ विशेष पदार्पणकर्ते, रंगत तुफान!

नऊ खेळाडू करणार ‘विशेष डेब्यू’ –
या सामन्याची खरी रंगत भारतीय संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये दडलेली आहे. कारण या संघात कर्णधार शुभमन गिलसह एकूण नऊ खेळाडू असे असतील, जे ईडन गार्डन्सवर आपला पहिलाच कसोटी सामना खेळतील. यंदाच्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या १४ सदस्यीय भारतीय संघात केवळ दोनच खेळाडू असे आहेत ज्यांना ईडन गार्डन्सवर कसोटी सामन्याचा अनुभव आहे.
केवळ दोघांनाच या मैदानावर कसोटी खेळण्याचा अनुभव –
हे अनुभवी खेळाडू म्हणजे केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे आहेत. या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे. राहुलची फलंदाजीतील स्थिरता आणि जडेजाची अष्टपैलू क्षमता संघासाठी महत्त्वाची ठरेल. या दोघांना वगळता, उर्वरित १२ खेळाडू या मैदानावरच्या कसोटी क्रिकेटच्या वातावरणाशी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.
हेही वाचा – IPL 2026 साठी KKR चा मास्टरस्ट्रोक! CSK आणि RR च्या दिग्गजावर सोपवली मोठी जबाबदारी
त्यामुळे जेव्हा पहिल्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर होईल, तेव्हा शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील नऊ खेळाडू ईडन गार्डन्सवर कसोटी पदार्पण करतील, जो एक खास योग असेल. ईडन गार्डन्सला एक गौरवशाली इतिहास आहे, पण सहा वर्षांनंतर कसोटीचे पुनरागमन संघासमोर एक नवी आणि रोमांचक आव्हान घेऊन आले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : बीसीसीआयच्या निर्देशानंतर हिटमॅन विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही? MCA चा धक्कादायक खुलासा!
पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.





