IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीवरही पावसाचे सावट
Updated On:

जोहान्सबर्ग – सेंच्युरीयनवर झालेल्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवस संततधार पावसाने वाया गेला होता. आता येथील वॉंडरर्स मैदानावर दुसरी कसोटी उद्यापासून(दि.3) सुरु होत असून त्यातही पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे युके मेट संस्थेने सांगितले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोहान्सबर्गला जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे वॉंडरर्स मैदानाची खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे.
या सामन्यात पहिले दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी दुपारनंतर जोदार पाउस होणार असून पुढील 48 तास अशाच जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





