IND vs SA 1st T20 : संजू सॅमसनचे वादळी शतक, टीम इंडियानं द.आफ्रिकेसमोर उभारला धावांचा डोंगर….

IND vs SA 1st T20 Match live Score Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजू सॅमसनच्या तूफानी शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकांत आठ गडी गमावून 202 धावा केल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेला विजयासाठी 203 धावांचे आव्हान मिळाले आहे.
Innings Break! #TeamIndia post 202/8 on the board!
1⃣0⃣7⃣ for @IamSanjuSamson
3⃣3⃣ for @TilakV9
2⃣1⃣ for captain @surya_14kumarOver to our bowlers now! 👍👍
Scorecard ▶️ https://t.co/0OuHPYaPkm#SAvIND pic.twitter.com/UY6Wcm7Cmn
— BCCI (@BCCI) November 8, 2024
टीम इंडियासाठी संजू सॅमसनने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावले. सॅमसन याने सामन्यात 50 चेंडूंचा सामना करताना 107 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 10 षटकार आणि 7 चौकार मारले. पीटरच्या गोलंदाजीवर ट्रिस्टन स्टब्सने त्याचा झेल पकडला आणि सॅमसनची वादळी खेळी संपुष्टात आली.
संजू व्यतिरिक्त तिलक वर्माने 18 चेंडूत 33 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव 21 धावा करून बाद झाला. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. हार्दिक पांड्या केवळ 2 धावा करू शकला, तर रिंकू सिंगही केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टी-20 संघात पुनरागमन करणारा अक्षर पटेलही काही विशेष करू शकला नाही, त्याने 7 चेंडूत 7 धावा केल्या. अशा प्रकारे भारताने 20 षटकात 8 विकेट गमावून 202 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत गेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक 3 बळी घेतले. यासाठी त्यानं 4 षटकात 37 धावा खर्च केल्या. मार्को जॅनसेन, केशव महाराज, पीटर आणि पॅट्रिक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संजून सॅमसन रचला इतिहास…
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. सॅमसनने याआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 111 धावांची इनिंग खेळली होती. आता पुढच्याच डावात सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आहे. यासह संजू सॅमसन आफ्रिकेविरूध्द शतक झळकावून इतिहास रचला आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनपूर्वी सलग दोन शतक करण्याची किमया तीन फलंदाजांनी साधली आहे. त्याच्याआधी फ्रान्सचा गुस्ताव्ह मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे आणि आता संजू सॅमसनने अशी कामगिरी केली आहे.
Retirement : दिग्गज क्रिकेटरकडून चाहत्यांना मोठा धक्का, वनडेमधून अचानक केली निवृत्तीची घोषणा….
शेवटच्या 5 षटकांत बिघडला खेळ..
एकवेळ भारतीय संघाने 2 गडी गमावून 167 धावा केल्या होत्या आणि 15 व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 विकेट गमावून 167 धावा झाली होती. त्यानंतर टीम इंडियाला पुढच्या 5 षटकात केवळ 35 धावा करता आल्या. जिथे भारत एकेवेळ 230-235 धावांचे स्वप्न पाहत होता, तिथे शेवटच्या 5 षटकातील कामगिरीने संपूर्ण खेळ खराब केला. भारतीय संघानेही शेवटच्या 5 षटकांत 6 विकेट गमावल्या.





