Retirement : दिग्गज क्रिकेटरकडून चाहत्यांना मोठा धक्का, वनडेमधून अचानक केली निवृत्तीची घोषणा….

Afghanistan cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद नबी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसीब खान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद नबी टी-20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून खेळत राहणार आहे.
नसीब खानने क्रिकबझला सांगितले की, “होय, मोहम्मद नबी (Mohammad Nabi) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे आणि त्याने आधीच आपल्या इच्छेबद्दल बोर्डाला कळवले होते. त्याने मला काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपली एकदिवसीय कारकीर्द संपवायची आहे. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.” ते पुढे म्हणाले की, “आम्हाला समजले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, त्याला त्याच्या T20 कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ही त्याची सध्याची योजना आहे.आम्हाला आशा आहे की तो आपली टी-20 कारकीर्द पुढे सुरू ठेवेल.”
वनडेतून केली निवृत्तीची घोषणा….
39 वर्षीय मोहम्मद नबी (Mohammad Nabi) हा अफगाणिस्तानच्या वनडे संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. मोहम्मद नबीने 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून प्रभाव पाडला. मोहम्मद नबीने आतापर्यंत 165 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3,549 धावा केल्या आहेत आणि त्याबरोबरच गोलंदाजीतही 171 बळीही घेतले आहेत. ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मोहम्मद नबीने अफगाणिस्तानसाठी केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत.
🚨 UPDATE 🚨
Afghanistan’s ace all-rounder, President Mohammad Nabi, is set to retire from ODI cricket after the conclusion of the upcoming 2025 Champions Trophy in Pakistan. pic.twitter.com/cyN4TwibOJ
— CricTracker (@Cricketracker) November 8, 2024
आयपीएलमध्येही दाखवली आहे आपली चुणूक…
मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) याशिवाय आयपीएलच्या 24 सामन्यांमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. मोहम्मद नबीने या लीगमध्ये 143.33 च्या वेगवान स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीमध्ये 15 बळीही घेतले आहेत. मोहम्मद नबीने आपल्या अनुभव आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाला अनेक प्रसंगी विजय मिळवून दिला आहे.
सध्या मोहम्मद नबी (Mohammad Nabi ) अफगाणिस्तान वनडे संघाचा एक भाग आहे, जिथे तो शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. अफगाणिस्तान संघाने पहिला वनडे 92 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नबीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 79 चेंडूत 84 धावा आणि एक विकेट घेतली होती. आता दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 9 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला होणार आहे.






