Trophy Controversy : मोहसिन नक्वींना ट्रॉफी घेऊन जाणं भोवणार! ट्रॉफीबाबत काय आहेत आयसीसीचे नियम? जाणून घ्या

मोहसिन नक्वींचे असभ्य वर्तन –
मोहसिन नक्वी यांनी नियमांचे उल्लंघन करत ट्रॉफी आणि पदके आपल्या हॉटेलवर घेऊन गेले. यामुळे बीसीसीआय संतप्त झाले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत याचा कडाडून विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआय मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणार आहे.
Never in history has a nation faced such humiliation in just 2 weeks.
First match: Refused handshake
Second match: Belt treatment to Pak bowlers
Third match: Mohsin Naqvi walked away with trophy.
Well done boys
#AsiaCupFinal #INDvsPAK#mohsinnaqvi pic.twitter.com/B4ctEiBc8p— Abhinav Rajput (@Abhinavrt) September 28, 2025
ट्रॉफीबाबत नियम काय सांगतात?
क्रिकेटच्या नियमांनुसार, टूर्नामेंटच्या विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान केली जाते. विजेता संघ काही काळ ट्रॉफी आपल्याकडे ठेवतो आणि नंतर त्याला ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते. मात्र, एखाद्या संघाने विशिष्ट व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यास याबाबत नियम स्पष्ट नाहीत. तरीही, मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी दुसऱ्या व्यक्तीमार्फत भारतीय संघाला देण्याचा पर्याय न स्वीकारता ती स्वतःकडे ठेवली, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला.
हेही वाचा – IND vs PAK : गौतम गंभीरने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
भारताचा ट्रॉफीविना विजयोत्सव –
अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर मोहसिन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी पोडियमवर आले होते. भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने ते बराच वेळ पोडियमवर थांबले. अखेरीस भारतीय संघाने ट्रॉफीविना पोडियमवर चढत विजयाचा जल्लोष साजरा केला.
आता पुढे काय?
मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याचे दिसते. बीसीसीआय आता आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रार करणार आहे. भारतीय संघाला ट्रॉफी कधी मिळेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे. क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे.





