IND vs PAK Hockey : भारत-पाक हॉकी सामन्यात खिलाडूवृत्तीचा विजय! ‘हस्तांदोलन अन् ‘हाय-फाय’ने, वेधलं लक्ष, पाहा VIDEO

IND vs PAK Hockey Team Players handshake and high five : मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुल्तान जोहोर कप ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ३-३ असा बरोबरीत संपला. ऑपरेशन सिंदूर आणि बीसीसीआयच्या ‘नो हँडशेक’ धोरणानंतर या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भारत आणि पाकिस्तानच्या ज्युनियर संघांनी राष्ट्रगीतानंतर आणि सामन्याच्या समाप्तीनंतर हस्तांदोलन आणि ‘हाय-फाय’ करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले आणि एक नवा आदर्श निर्माण केला.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी राष्ट्रगीतानंतर एकमेकांना ‘हाय-फाय’ देत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले. अटीतटीच्या लढतीनंतरही खेळाडूंनी हस्तांदोलन करत खिलाडूवृत्ती जपली. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्यांमध्ये नेहमीच काही ना काही नाट्य पाहायला मिळते, परंतु या वेळी मैदानावरील चित्र सकारात्मक राहिले.
आशिया कपमधील वादाची पार्श्वभूमी –
Before #PAKvIND at Sultan Johor Hockey Cup, India’s junior hockey team greeted Pakistan players with grace. A lesson for @BCCI & @ICC. What the Indian cricket team did under ICC umbrella broke the spirit of sport & is evidence of planned theatrics shamed the game. @MohsinnaqviC42 pic.twitter.com/si7de6wtPt
— Maham Fazal (@MahamFazal_) October 14, 2025
काही आठवड्यांपूर्वी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला होता. त्या वेळी भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळले होते, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. हा वाद केवळ मैदानापुरता मर्यादित राहिला नाही, तर बक्षीस वितरण समारंभापर्यंत पोहोचला. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. परिणामी, नक्वी यांनी ट्रॉफी हॉटेलवर नेली आणि भारतीय संघाला विजेतेपदाची ट्रॉफीविनाच मायदेशी परतावे लागले.
हेही वाचा – Team India : नव्या कर्णधाराची विराट-रोहितशी भेट! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या खास क्षणाचा VIDEO व्हायरल
सुल्तान जोहोर कपमधील सकारात्मक चित्र –
मात्र, सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेत चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आपल्या खेळाडूंना भारतीय खेळाडूंसोबत कोणताही वाद टाळण्याचे आणि केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले होते. या सूचनांचे पालन करत दोन्ही संघांनी मैदानावर आणि मैदानाबाहेर खिलाडूवृत्तीचे वर्तन दाखवले. या सामन्याने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांमधील तणाव कमी करत खिलाडीवृत्तीला प्राधान्य देणारा संदेश दिला आहे.





