IND vs PAK : भारताने हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानात संतापाची लाट! पीसीबीची रेफरीबद्दल आयसीसीकडे तक्रार

सामन्यापूर्वी रेफरींच्या सूचना –
सामन्यापूर्वी रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न करता मैदान सोडल्याने पाकिस्तानात या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट समुदायात नाराजी पसरली असून, याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपमान म्हणून पाहिले जात आहे.
पीसीबीची आयसीसीकडे तक्रार –
🚨 Breaking: PCB Chairman & ACC President Mohsin Naqvi has officially demanded the immediate removal of match referee Andy Pycroft from the remainder of the Asia Cup following the India vs Pakistan clash on Sunday. #mohsinnaqvi #pakvsind #pakistancricket #asiacup2025 pic.twitter.com/3f6FEcLjNl
— ProSports (@ProSportsStudio) September 15, 2025
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यानंतर रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीचे चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी 15 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “पीसीबीने सामन्याच्या रेफरीद्वारे आयसीसीच्या आचारसंहितेचा आणि एमसीसीच्या क्रिकेट भावनेतील नियमांचा भंग केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. आम्ही अँडी पायक्रॉफ्ट यांना एशिया कपच्या सामन्यातील रेफरी पॅनलमधून तातडीने हटवण्याची मागणी करत आहोत.”
हेही वाचा – IND vs PAK : हस्तांदोलन न करणे टीम इंडियाला महागात पडणार? ICC चा नियम काय सांगतो? जाणून घ्या
भारताचा हस्तांदोलन न करण्याचा निर्णय –
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघाने सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी ही विजय सशस्त्र दलांना समर्पित केला. यादव म्हणाला, “काहीवेळा काही गोष्टी क्रीडाप्रेमापेक्षा मोठ्या असतात. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांच्या कुटुंबीयांना आमचा पाठिंबा व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत एकजुटीने उभे आहोत.”
हेही वाचा – IND vs PAK : कर्णधार सूर्याने ठोकला विजयी षटकार! भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पाडला फडशा
क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण –
भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात या घटनेला मोठे प्रकरण बनवण्याचा प्रयत्न होत असून, यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेटमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आता आयसीसी आणि आशिया कप आयोजक या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





