IND vs PAK : भारताचा विजयी तिलक! पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा धूळ चारत नवव्यांदा आशिया कपवर कोरलं नाव

IND vs PAK India won the Asia Cup 2025 Trophy : एसीसी आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत नवव्यांदा आशिया कप जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात तिलक वर्माने नाबाद ६९ धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १९.१ षटकांत सर्वबाद १४६ केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने १९.४ षटकांत ५ गडी गमावून ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.
कुलदीपच्या फिरकीरसमोर पाक फलंदाजांनी टाकली नांगी –
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. साहिबझादा फरहान आणि फखर झमान यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. मात्र, यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानच्या डावाला सुरुंग लावला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती (२) आणि अक्षर पटेल (२) यांनीही शानदार कामगिरी केली. शेवटच्या दोन विकेट्स जसप्रीत बुमराहने घेतल्या. पाकिस्तानसाठी साहिबझादा फरहानने सर्वाधिक ५७ धावांची वादळी खेळी साकारली. पण त्यावर तिलक वर्माच्या खेळीने पाणी सोडले.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦 🏆
A dominant performance capped by an unbeaten campaign 💪
Congratulations to #TeamIndia on winning #AsiaCup2025 🇮🇳 🥳
Scorecard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#Final pic.twitter.com/n9fYeHfByB
— BCCI (@BCCI) September 28, 2025
तिलक वर्माची ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळी –
Raw emotions 🔥
What it means to win for #TeamIndia 🇮🇳
Scoreboard ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/3gml0uDqe9
— BCCI (@BCCI) September 28, 2025
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. प्रत्येक सामन्यात भारताला धमाकेदार सुरुवात करुन देणारा अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल पुन्हा अपयशी ठरले. त्यामुळे भारताची अवस्था चार षटकांत ३ बाद २० धावा अशी होती. मात्र, यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरला, ५७ धावांची शानदार भागीदारी करून संघाला पुन्हा रुळावर आणले.
सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबे दिली साथ –
सॅमसन बाद झाल्यानंतर, शिवम दुबे तिलकला साथ देण्यासाठी आला आणि काही मोठे फटके मारत त्याने संघाला विजयी स्थितीत आणले. दोघांनी फक्त ४० चेंडूत ६० धावांची जलद भागीदारी केली. या दरम्यान, तिलकने आपले लढाऊ अर्धशतक पूर्ण केले आणि संघासाठी भिंतीसारखे उभा राहिला. १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दुबे बाद झाला, ज्यामुळे भारताला शेवटच्या सहा चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकात, तिलकने हारिस रौफच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून विजयाच्या जवळ पोहोचवले. यानंतर रिंकू सिंगने चौथ्या चेंडूवर चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केला. पाकिस्तानकडून फहीम अशरफने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND vs PAK : साहिबझादा फरहानने रचला इतिहास, बुमराहविरुद्ध ‘ही’ खास कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
भारताने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद –
भारताने २०२३ नंतर सलग दुसरा आशिया कप जिंकला, पण या विजयाने ते सलग तिसरे विजेतेपद पटकाणार एकमेव संघ ठरला. ग्रुप स्टेज आणि सुपर फोर्समध्ये पाकिस्तानला दोन वेळा हरवल्यानंतर अंतिम सामन्यातही सलग तिसऱ्यांदा धूळ चारली. सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले, तर जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी गोलंदाज हारिस रोफला बोल्ड करत त्याच्या आधीच्या वादग्रस्त इशाऱ्याचे प्रत्युत्तर दिले. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० आशिया कपमध्ये ११-३ असे वर्चस्व कायम राखले.





