IND vs PAK : अभिषेक-कुलदीपसह गिलने भारतीय फिल्डींगची काढली लाज! एक-दोन नव्हे तब्बल चार कॅच सोडले

IND vs PAK India poor fielding effort : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 आशिया चषक 2025 च्या बहुप्रतिक्षित सुपर फोर सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना निराश केले. सामन्यात आतापर्यंत भारतीय संघाने चार सोपे झेल सोडले, ज्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना जीवदान मिळाले आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला, ज्यामुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 171 धावांचा डोंगर उभारला.
अभिषेकने सोडला फरहानचा झेल
भारतीय संघासाठी पहिले षटक हार्दिक पंड्याने टाकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अभिषेक शर्माकडे सोप्या झेलाची संधी होती, पण त्याने झेल सोडला. झेल सोडल्यानंतर अभिषेक निराश दिसला. या चुकीमुळे साहिबजादाला जीवदान मिळाले आणि त्याने आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली.
कुलदीप यादवने सैम अयूबला दिले जीवदान –
▶️0.3 – Abhishek Sharma drops Sahibzada Farhan
▶️4.4 – Kuldeep Yadav drops Saim Ayub
▶️7.3 – Abhishek Sharma drops Sahibzada FarhanThree drops by Team India so far!#PAKvIND pic.twitter.com/Npr2c90380
— Rana Ahmed (@RanaAhmad056) September 21, 2025
पाचव्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर सैम अयूबच्या बॅटला लागलेला चेंडू कुलदीपकडे गेला. हा झेल अत्यंत सोपा होता, पण कुलदीपने तो पकडला नाही. यामुळे सैम अयूबलाही जीवदान मिळाले. त्याचबरोबर शुबमन गिलने पण १९व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर फहीम अशरफचा अतिशय सोपा झेल सोडला.
हेही वाचा – ‘हात मिळवण्यात काहीच गैर नाही…’, IND vs PAK हस्तांदोलन वादावर मोहम्मद अझरुद्दीनचे मोठं वक्तव्य
अभिषेकने पुन्हा सोडला फरहानचा झेल –
Quota player Shubman Gill dropped another simple catch.🤡#ShubmanGill #INDvPAK pic.twitter.com/5zTqWH1rGW
— 𝐇𝐢𝐭𝐦𝐚𝐧 ⁴⁵ ♛ (@ROHITHEGOAT45) September 21, 2025
आठव्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर साहिबजादा फरहानने पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या अभिषेक शर्माकडे झेल पकडण्याची संधी होती. अभिषेकने चेंडूजवळ आला होता, पण त्याचा एक हात चेंडूला लागला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला, ज्यामुळे षटकार गेला. अभिषेकने झेल पकडला नसला तरी चेंडू आतल्या दिशेने फेकून षटकार रोखता आला असता, पण त्याने पूर्णपणे निराशा केली.
हेही वाचा – IND vs PAK : आऊट की नॉआऊट? संजू सॅमसनने घेतलेल्या कॅचने पेटला वाद, फखर झमानही चकित, पाहा VIDEO
भारताला खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका –
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पाकिस्तानने भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत 20 षटकांत पाच गडी गमावून 171 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने 58 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने दोन, तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





