IND vs PAK : कर्णधार सूर्याने ठोकला विजयी षटकार! भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पाडला फडशा

IND vs PAK India beat Pakistan in Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पाडला. या सामन्यात भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून भारतासमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ३ गडी गमावून सामना जिंकला. यासह भारतीय संघ सुपर-४ मध्ये दाखल झाला.
सूर्याने साकारली नाबाद ४७ धावांची खेळी –
भारताने २५ चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला हरवले आणि चालू स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. उर्वरित खेळाडूंनीही तसेच केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने २० षटकांत नऊ विकेट्सवर १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १५.५ षटकांत तीन विकेट्सवर १३१ धावा केल्या आणि सामना जिंकला.
तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी –
2⃣ wins on the bounce for #TeamIndia! 🙌
A dominating show with bat & ball from Surya Kumar Yadav & Co. to bag 2 more points! 👏 💪
Scorecard ▶️ https://t.co/W2OEWMTVaY#AsiaCup2025 pic.twitter.com/hM7iin7AAq
— BCCI (@BCCI) September 14, 2025
भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही निराश केले नाही आणि लक्ष्य सहज गाठले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा भारताला चांगली सुरुवात दिली, परंतु पॉवरप्लेमध्येच दोघांनीही आपले विकेट्स गमावले. गिल १० धावा केल्यानंतर बाद झाला, तर अभिषेकने ३१ धावा केल्या. यानंतर कर्णधार सूर्यकुमारने तिलक वर्मासह आघाडी घेतली. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. ३१ धावा काढून तिलक बाद झाला.
त्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यांनी मिळून भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताकडून सूर्यकुमार ४७ धावा काढून नाबाद परतला, तर दुबे १० धावा काढून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून सॅम अयुबने तिन्ही विकेट्स घेतल्या. यासह भारताने सुपर फोर टप्प्यासाठी आपला दावा मजबूत केला आहे. याआधी झालेल्या सामन्यात भारताने यजमान यूएईचा पराभव केला होता.
कुलदीप यादवने घेतल्या सर्वाधिक विकेट्स –
For his superb bowling performance, Kuldeep Yadav bags the Player of the Match award! 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/W2OEWMTVaY
#TeamIndia | #AsiaCup2025 | @imkuldeep18 pic.twitter.com/vAgMmWZ5r1— BCCI (@BCCI) September 14, 2025
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ चा भव्य सामना खेळला जात आहे. या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तानच्या संघाने २० षटकांत नऊ गडी गमावून १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा केल्या. त्याच वेळी, भारताकडून कुलदीप यादवने तीन आणि जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेटस घेतली.





