Ind Vs Pak : आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ ला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भारत (Ind Vs Pak) आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया (Ind Vs Pak) आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे.मात्र, क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठा आकर्षण असलेला भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. दुर्दैवाने, पाकिस्तान सरकारने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने स्पष्ट केले की, त्यांचा संघ स्पर्धेत सहभागी होईल, पण भारताविरुद्धचा हा ग्रुप स्टेज सामना खेळणार नाही. हे ‘selective participation’ असल्याचे ICC ने नमूद करत पाकिस्तानला दीर्घकालीन परिणामांची चेतावणी दिली आहे. अद्याप ICC कडून या निर्णयावर अधिकृत अंतिम घोषणा झालेली नाही, पण पाकिस्तान संघ श्रीलंकेत पोहोचला असून इतर सामने खेळण्याची तयारी करत आहे. Gautam Gambhir भारतीय संघ मैदानात उतरणार पाकिस्तानच्या बहिष्कारानंतरही भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. टीम इंडिया कोलंबोला जाणार असून, सामन्याच्या दिवशी मैदानात उतरणार आहे. यामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे की, एका संघाच्या अनुपस्थितीत सामना कसा होईल आणि त्याचे गुण, स्पर्धेची अखंडता यावर काय परिणाम होईल. गौतम गंभीरचे जुने विधान पुन्हा चर्चेत या संपूर्ण प्रकरणात भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे २०१९ मधील एक जुने विधान पुन्हा चर्चेत आले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर गंभीर यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंधांबाबत तीव्र मत व्यक्त केले होते. गंभीर म्हणाले होते, “पाकिस्तानसोबतचे संबंध एकतर पूर्णपणे तोडा किंवा सर्वकाही सुरळीत ठेवा, ‘सशर्त बंदी’ असं काही नसतं. पुलवामात जे घडलं ते कधीही विसरता येणार नाही. आशिया चषक स्पर्धेत तरी किमान पाकिस्तानवर बहिष्कार टाकायलाच हवा.” ते पुढे म्हणाले, “भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देणार असेल तर, कोणत्याही माध्यमांनी त्यांना दोष देऊ नये. दोन गुण इतके महत्वाचे नाहीत. देश आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ज्या ४० सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत, ते क्रिकेट सामन्यांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. याच कारणावरून जर भारतीय संघाने अंतिम फेरी सोडली, तर देशाने त्यासाठी तयार असले पाहिजे.” या विधानाचा संदर्भ आता पाकिस्तानच्या बहिष्काराशी जोडला जात आहे. २०१९ नंतरही भारताने आशिया चषक २०२६ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी जिंकली होती. गंभीर यांचे हे मत आता पुन्हा व्हायरल होत आहे. हे पण वाचा : Rohit Sharma : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित शर्माने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाला…