IND vs PAK Final : पाकिस्तानचा भारतावर दणदणीत विजय! अंडर-19 आशिया चषकावर कोरलं नाव

IND vs PAK Final Pakistan beat India by 191 runs : एसीसी अंडर-19 आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर वर्चस्व राखले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३४८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात भारताचा संघ २६.२ षटकांत १५६ धावांवर गारद झाला. पाकिस्तानच्या या विजयाचे शिल्पकार शतकवीर समीर मन्हास आणि वेगवान गोलंदाज अली रझा ठरले.
समीर मिन्हासची विक्रमी शतक –
Watching the U19 ACC Asia Cup final, it feels like the upcoming Indian generation is built only for T20 cricket. There’s no ODI game awareness—just blind hitting—which is why we lost the final against Pakistan by 191 runs.#INDvsPAK pic.twitter.com/HvfH3Ij5ki
— Soldiers Village (@ChessMaster1902) December 21, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ३४७ धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानच्या या विशाल धावसंख्येचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे समीर मिन्हास. समीरने केवळ ११३ चेंडूंमध्ये १५२ च्या स्ट्राईक रेटने १७२ धावांची स्फोटक खेळी केली. त्याला अहमद हुसैनने ५६ धावांचे मोलाचे सहकार्य दिले, तर फरहान युसूफने १९ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – IND vs PAK Final : भारत-पाक फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; खेळाडूंमध्ये भरमैदानात वादावादी, पाहा VIDEO
भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी –
भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. किशन कुमार सिंह सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने ५ षटकांत ५० धावा दिल्या. दीपेश देवेंद्रनने १० षटकांत ८३ धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. तसेच हेनिल पटेल आणि खिलन पटेलने प्रत्येकी २ आणि कनिष्क चौहानने १ विकेट्स घेतल्या, परंतु धावांचा ओघ रोखता आला नाही.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली –
३४८ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ पूर्णपणे गडगडला. संपूर्ण संघ २६.२ षटकांत अवघ्या १५६ धावांवर गारद झाला. स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी (२६ धावा) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (२ धावा) स्वस्तत बाद झाले. आरोन जॉर्जने १६ धावा केल्या, तर भारताकडून सर्वाधिक ३६ धावा दीपेश देवेंद्रनने केल्या.
पाकिस्तानी गोलंदाजांचा भेदक मारा –
पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सैयाम, अब्दुल सुभान आणि हुजैफा अहसान यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत भारताला सावरण्याची संधीच दिली नाही. या विजयासह पाकिस्तानने अंडर-19 आशिया चषकाचे जेतेपद पटकावत ऐतिहासिक विजय साजरा केला आहे.





