IND vs PAK : भारत-पाक पुन्हा एकदा येणार आमने-सामने! ‘या’ दिवशी रंगणार ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK Rising Stars T20 Tournament 2025 : आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत करून ट्रॉफी पटकावली होती. आता नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. दोन्ही देशांच्या ‘अ’ संघांमध्ये ही लढत होईल. या युथ स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतासाठी खेळताना दिसणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) रायझिंग स्टार्स टी-२० चॅम्पियनशिपची सुरुवात १४ नोव्हेंबर २०२५ पासून दोहा, कतार येथे होत आहे. पूर्वी ही स्पर्धा ‘इमर्जिंग टीम्स आशिया कप’ म्हणून ओळखली जात होती, मात्र आता नाव बदलण्यात आले आहे. या टी-२० स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून, त्यांना दोन गटांत विभागले आहे.
- गट अॅ : अफगानिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, श्रीलंका
- गट बी : भारत, ओमान, पाकिस्तान, युएई
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगानिस्तान आणि श्रीलंका हे देश आपले ‘अ’ संघ पाठवणार आहेत, तर युएई, ओमान आणि हाँगकाँग आपले मुख्य संघ उतरवणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना १६ नोव्हेंबर रोजी होईल.
वैभव सूर्यवंशी भारताच्या संघात सामील –
Qatar will host the ACC Asia Cup Rising Stars (T20) from November 14 to 23 in Doha.
Group A: Afghanistan A, Sri Lanka A, Bangladesh A and Hong Kong
Group B: Pakistan Shaheens, India A, UAE and Oman.
Pakistan Shaheens vs India A clash is set for November 16 (Sunday) pic.twitter.com/OtXzyl1tzJ
— Pavilion Post (@CricinsightsX) October 27, 2025
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पूर्ण झाली आहे. यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्थान मिळाले आहे. बीसीसीआय एक-दोन दिवसांत १५ सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. वैभवने आतापर्यंत अंडर-१९ संघासाठी तुफानी फलंदाजी करून दाखवले आहे. आता एसीसी रायझिंग स्टार्स टी-२० चॅम्पियनशिपमध्येही तो धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक संपूर्ण वेळापत्रक:
- १४ नोव्हेंबर २०२५ : ओमान वि. पाकिस्तान | भारत वि. युएई
- १५ नोव्हेंबर २०२५ : बांगलादेश वि. हाँगकाँग | अफगानिस्तान वि. श्रीलंका
- १६ नोव्हेंबर २०२५ : ओमान वि. युएई | भारत वि. पाकिस्तान
- १७ नोव्हेंबर २०२५ : हाँगकाँग वि. श्रीलंका | अफगानिस्तान वि. बांगलादेश
- १८ नोव्हेंबर २०२५ : पाकिस्तान वि. युएई | भारत वि. ओमान
- १९ नोव्हेंबर २०२५ : अफगानिस्तान वि. हाँगकाँग | बांगलादेश वि. श्रीलंका
- २१ नोव्हेंबर २०२५ : उपांत्य फेरी (गट अॅ१ वि. बी२) आणि (गट बी१ वि. अॅ२)
- २३ नोव्हेंबर २०२५ : अंतिम फेरी
या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करेल!





