IND vs PAK Final पूर्वी ‘या’ गोष्टींवर घालण्यात आली बंदी! दुबई पोलिसांनी प्रेक्षकांसाठी जारी केली कडक नियमावली

IND vs PAK Final Dubai Police issue strict guidelines : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक लढत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतिम सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असून, दुबई पोलिसांनी प्रेक्षकांसाठी कडक नियमावली आणि बंदी घातलेल्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
दुबई पोलिसांनी जाहीर केली नियमावली –
आशिया कप 2025 चा अंतिम सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी दुबई पोलिसांनी विशेष सूचना जारी केल्या आहेत. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार असून, प्रेक्षकांना किमान तीन तास आधी स्टेडियममध्ये पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका तिकिटावर केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश मिळेल आणि सामन्यादरम्यान स्टेडियममधून बाहेर पडल्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही. प्रेक्षकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#News | Dubai ESC Affirm Stadium Security Readiness Ahead of Asia Cup Title Decider
Details:https://t.co/NAUQpcOmvK#EventsSecurityCommittee#AsiaCupCricket2025 #YourCommitmentisHappiness pic.twitter.com/RBUZAQ2EXt
— Dubai Policeشرطة دبي (@DubaiPoliceHQ) September 27, 2025
बंदी घातलेल्या वस्तू –
- दुबई पोलिसांनी खालील वस्तूंवर स्टेडियममध्ये बंदी घातली आहे:
- फटाके, फ्लेअर, लेझर पॉइंटर्स आणि कोणतेही धोकादायक साहित्य.
- टोकदार वस्तू, शस्त्रे, विषारी पदार्थ आणि रिमोट-नियंत्रित उपकरणे.
- मोठ्या छत्र्या, कॅमेरा ट्रायपॉड, सेल्फी स्टिक आणि अनधिकृत व्यावसायिक छायाचित्रण उपकरणे.
- आयोजकांनी मान्यता न दिलेले बॅनर, झेंडे.
- पाळीव प्राणी, सायकली, स्केटबोर्ड, स्कूटर आणि काचेच्या वस्तू.
हेही वाचा – BCCI : मिथुन मन्हास यांच्यानंतर प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांना मोठी जबाबदारी; BCCI मध्ये करणार ‘हे’ काम
दंड आणि कारवाई –
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. बंदी घातलेल्या वस्तू स्टेडियममध्ये आणल्यास 1.2 लाख ते 7.24 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, सामन्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 2.41 लाख ते 7.24 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. सामन्यासाठी विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आल आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नियमांचे पालन करून सामन्याचा आनंद घेण्याचे आवाहन दुबई पोलिसांनी केले आहे.





