भारताच्या विजयानंतर पंतप्रधानांच्या पोस्टवर ख्वाजा आसिफचा संताप ; म्हणाले, “भारत अन् मोदींचा…”

IND vs PAK Asia Cup 2025। २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला विजयाबद्दल अभिनंदन करताना ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ चांगलेच संतापले. मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी,”शांतता अशा प्रकारे येणार नाही” असे खोचकपणे म्हटले आहे.
ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान मोदींच्या माजी पोस्टबद्दल एक पोस्ट शेअर करताना “क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट करून, मोदी त्यांचे राजकारण वाचवण्यासाठी उपखंडातील शांतता आणि समस्यांचे निराकरण करण्याची शक्यता नष्ट करत आहेत. अशा प्रकारे शांतता आणि आदर पुनर्संचयित करता येणार नाही.” पाकिस्तान-भारत युद्धाचा स्कोअर ६/० होता. आम्ही काहीही बोलत नाही आहोत; “भारत आणि जगात मोदींचा अपमान झाला आहे.”असे म्हणत उलट्या बोंबा मारल्या आहेत.
आधी शरीफ, नंतर ख्वाजा आसिफ खोटे बोलले IND vs PAK Asia Cup 2025।
ख्वाजा आसिफ यांच्या पोस्टबद्दल मनोरंजक गोष्ट अशी आहे की फक्त ७२ तासांपूर्वी, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या व्यासपीठावर दावा केला होता की, पाकिस्तानी सैन्याने भारतासोबतच्या चार दिवसांच्या युद्धात भारतीय हवाई दलाचे ७ विमान पाडले होते. आता, ७२ तासांनंतर, त्यांच्याच संरक्षणमंत्र्यांनी ६ विमान पाडल्याचा दावा केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान सरकारने अनेक वेळा खोटे बोलले आहे. त्यांनी वारंवार भारतीय विमान पाडल्याचे खोटे दावे केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या दाव्यांमधील संख्या देखील वारंवार बदलत आहेत.
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same – India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी काय म्हटले? IND vs PAK Asia Cup 2025।
अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल एकच आहे: भारताचा विजय.” आमच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन.” आशिया कपच्या अंतिम सामन्यात, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारताने १९.४ षटकांत ५ गडी गमावून सामना जिंकला.





