IND vs PAK : मैदानावरच अभिषेक शर्मा अन् सुफयान मुकीम भिडले, भारत पाकिस्तान सामन्यात नेमकं काय घडलं…

IND vs PAK : ओमानमध्ये सुरू असलेल्या एमर्जिंग टीम एशिया कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात चांगलीच वादावादी झाली.
टीम इंडियाच्या ओपनर्सने दमदार सुरुवात केली, अभिषेक शर्माने सॉलिड बॅटिंग करत जोरदार चौकार-षटकार लगावले. मात्र, त्याच्या विकेटनंतर मैदानावर वादावादी घडल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्माला आउट केल्यानंतर पाकिस्तानी स्पिनर सूफयान मुकीमने तोंडावर बोट ठेवत शांत केल्याचा इशारा केला, ज्यामुळे अभिषेक चांगलाच भडकला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि मैदानावर तणाव निर्माण झाला.
सध्या भारत आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभाग घेणार का यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात हा सामना उभय देशातील क्रिकेट प्रेक्षकांना भारत पाकिस्तान लढतीची पर्वणी ठरला आहे.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांनी पहिल्याच पॉवरप्लेमध्ये 68 धावा कुटल्या आणि पाकिस्तानी गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली.
मात्र, 7व्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माचा आक्रमक खेळ सूफयान मुकीमने संपवला. विकेट घेतल्यानंतर त्याने तोंडावर बोट ठेवल्याची एक्शन करत अभिषेकला डिवचले. यामुळे अभिषेक चांगलाच भडकला.
दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच अंपायर आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तक्षेप करत खेळाडूंना शांत केले. मैदानावरील या प्रकारामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता, मात्र नंतर वाद निवळल्याने खेळ पुन्हा सुरू झाला.





