IND vs NZ 3rd Test : जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाही? BCCI नं धक्कादायक अपडेट केले जारी…

IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने मोठा बदल केला आहे. जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एकीकडे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा परिस्थितीत बुमराहला न खेळवणे निश्चितच आश्चर्यकारक आहे. अखेर बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये न ठेवण्याचे कारण काय?
तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसनंतर रोहित शर्माने जसप्रीत बुमराह न खेळण्याचे कारण स्पष्ट केले आणि म्हणाला की, “आम्हाला माहित आहे की आम्ही मालिकेत चांगला खेळ केलेला नाही. वानखेडेची खेळपट्टी चांगल्या स्थितीत दिसत आहे, आशा आहे की आम्ही त्यांना लवकरात लवकर सर्वबाद करू. तसेच संघाबदल बोलताना रोहित म्हणाला की, “जसप्रीत बुमराह आजारी असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे.”
दुसरीकडे, बीसीसीआयनेही बुमराहच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने एक अपडेट दिली आहे की, “बुमराहला व्हायरल संसर्ग झाला आहे, त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता.”
UPDATE:
Mr Jasprit Bumrah has not fully recovered from his viral illness. He was unavailable for selection for the third Test in Mumbai.#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
सध्याच्या मालिकेत बुमराहला 2 सामन्यात केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत. बुमराहचा फिटनेस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मोहम्मद शमीला या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात स्थान मिळालेले नाही, अशा परिस्थितीत बुमराह गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल.
IPL 2025 Retention : बंगळुरूने ‘या’ तीन खेळाडूंना ठेवलं कायम; विराटवर RCB ने केला पैशांचा वर्षाव…..
मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी न्यूझीलंडने 2 बदलही केले आहेत. कॅप्टन टॉम लॅथमने सांगितले की, मिशेल सँटनरला दुखापतीमुळे वेदना होत आहेत आणि ईश सोधीने त्याची जागा घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलेल्या टीम सौदीच्या जागी मॅट हेन्री आला आहे.





